Gold-Silver Rate Today: आज, १३ डिसेंबर (शनिवार) रोजी सोने आणि चांदीच्या भावात वाढ कायम आहे. सोने आणि चांदी सातत्यानं नवे विक्रम रचत आहेत. रुपयाचं मूल्य खाली घसरल्यामुळे, तसंच अमेरिकेच्या फेडरल बँकेनं व्याजदरात २५ बेसिस पॉईंट्सची कपात केल्यानंतरही बाजारात असलेल्या अनिश्चिततेमुळे गुंतवणूकदार क्रिप्टो (Crypto) आणि इतर पर्यायांऐवजी सोनं-चांदी खरेदी करत आहेत, ज्यामुळे त्यांच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.
आजचे सोन्या-चांदीचे भाव
भारतात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति किलोग्रॅम १,३३,२१० वर पोहोचला आहे, जो काल प्रति १० ग्रॅम १,३२,६६० होता. एक किलो चांदीचा भाव आज २,०४,१०० वर पोहोचला आहे, जो काल २,०१,१०० होता. शिवाय, भारतात २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० किलोग्रॅम १,२२,११० वर पोहोचला आहे आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० किलोग्रॅम ९९,९१० वर पोहोचला आहे.
पहिल्याच दिवशी ७३% भरला 'हा' IPO; ग्रे मार्केट दाखवतोय ₹२५५ चा फायदा, पाहा कोणता आहे आयपीओ?
मुंबई ते दिल्ली दर काय?
दिल्लीत, २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३३,३६० रुपये आणि २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२२,२६० रुपये आहे. १८ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम १,००,०६० रुपये आहे.
मुंबईत, आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३३,२१० रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,२२,११० रुपये आणि १८ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम ९९,९१० रुपये आहे.
चेन्नईत, आजचा २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,३४,९६० रुपये, २२ कॅरेट - प्रति १० ग्रॅम १,२३,७१० रुपये आणि १८ कॅरेटचा दर प्रति १० ग्रॅम १,०३,३१० रुपये आहे.
कोलकातामध्ये २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति दहा ग्रॅम १,३३,२१० रुपये, २२ कॅरेटचा भाव प्रति दहा ग्रॅम १,२२,११० रुपये आणि १८ कॅरेटचा भाव प्रति दहा ग्रॅम ९९,९१० रुपये झाला.
आजचा चांदीचा भाव
दिल्लीत आज एक किलो चांदीची किंमत वाढून ₹२,०४,१०० झाली, जी काल ₹२,०४,००० होती. शिवाय, मुंबई आणि कोलकातामध्ये चांदीची किंमत आज ₹२,०४,००० झाली आणि चेन्नईमध्ये ₹२,१६,१०० झाली. सोने आणि चांदी खरेदी करण्यापूर्वी सध्याच्या किमती तपासणं महत्वाचं आहे. शहरानुसार किंमती बदलू शकतात. म्हणून, तुमच्या शहरातील नवीन दर जाणून घेण्यासाठी दागिन्यांच्या दुकानाला भेट द्या.
Web Summary : Gold and silver prices are soaring, driven by a weaker rupee and global uncertainty. 24 Carat gold reaches ₹1,33,210 per kg. Mumbai's 24 Carat gold is ₹1,33,210 per 10 grams. Silver hits ₹2,04,100 per kg in Delhi.
Web Summary : रुपये में कमजोरी और वैश्विक अनिश्चितता के कारण सोने और चांदी की कीमतें बढ़ रही हैं। 24 कैरेट सोना ₹1,33,210 प्रति किलो तक पहुंचा। मुंबई में 24 कैरेट सोना ₹1,33,210 प्रति 10 ग्राम है। दिल्ली में चांदी ₹2,04,100 प्रति किलो पर पहुंची।