Gold -Silver Price Today: बुधवार, ११ मार्च रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. 'इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) नुसार, आज ९९९ शुद्धतेचं सोनं १,६०,६९२ रुपये प्रति १० ग्रॅम या दरानं मिळत आहे. मंगळवारी सोन्याचा भाव १,६०,१८८ रुपये होता, म्हणजेच आज सोन्याच्या दरात ५०४ रुपयांची वाढ झाली आहे. तसंच ९९५ शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज १६०,०४९ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला असून, यामध्ये ५०२ रुपयांची तेजी दिसून आली आहे. काल या सोन्याची किंमत १,५९,५४७ रुपये इतकी होती.
शुद्धतेनुसार सोन्याचे दर काय?
बाजारात आज ९१६ शुद्धतेचे सोने १४७,१९४ रुपये प्रति १० ग्रॅम या दरानं विकलं जात आहे. याचा मागील बंद भाव १,४६,७३२ रुपये होता, त्यानुसार आज हे सोने ४६२ रुपयांनी महागलंय. दुसरीकडे, bullions.co.in नुसार २४ कॅरेट सोन्याच्या दरात ७३० रुपयांची मोठी घसरण झाली असून, ते १६३,११० रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे.
'या' कार कंपनीच्या नफ्यात मोठी घसरण; आता ५० हजार नोकऱ्या जाणार, EV व्यवसायावरही संकट
चांदीच्या दरात मोठी घसरण
IBJA च्या आकडेवारीनुसार, चांदीच्या किमतीत आज मोठी घट झाली. आज एक किलो चांदीची किंमत २,६९,०५८ रुपये आहे. काल मंगळवारी चांदी २,७०,९४४ रुपये प्रति किलो दरानं विकली जात होती, म्हणजेच आज चांदीच्या दरात प्रति किलो १,८८६ रुपयांची घसरण झाली. दरम्यान, bullions.co.in वर चांदी २,७३,७४० रुपये प्रति किलो दरानं विकली जात असून, तिथे ३,६१० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली.
Web Summary : Gold prices increased by ₹504 per 10 grams, while silver decreased by ₹1,886 per kg according to IBJA. Different purities of gold are trading at varied prices, with 24-carat gold seeing a significant price drop on bullions.co.in.
Web Summary : आईबीजेए के अनुसार, सोने की कीमतों में ₹504 प्रति 10 ग्राम की वृद्धि हुई, जबकि चांदी ₹1,886 प्रति किलोग्राम सस्ती हुई। विभिन्न शुद्धता वाले सोने अलग-अलग कीमतों पर कारोबार कर रहे हैं, bullions.co.in पर 24 कैरेट सोने में भारी गिरावट आई है।