Gold Silver Rate On MCX: सोन्या-चांदीचे भाव त्यांच्या आतापर्यंतच्या उच्चांकी विक्रमापेक्षा बरेच खाली आले आहेत. गेल्या आठवड्यात ज्या वेगानं सोन्या-चांदीच्या किमतीत वाढ होत होती, त्याच्या अगदी उलट यावर्षी फेब्रुवारी महिन्यात मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. आज 'मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया' म्हणजेच एमसीएक्स (MCX) वर बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरात घट दिसून आली. सोन्याचा दर ०.६४ टक्क्यांच्या घसरणीनंतर १,५४,९०५ रुपये प्रति दहा ग्रॅमवर, तर चांदीचा दर २.७५ टक्क्यांच्या घसरणीनंतर २,३७,६५० रुपये प्रति किलोवर आला.
काय आहेत डिटेल्स?
एमसीएक्सवर शुक्रवारी सोन्याचा भाव १,५६,२९५ रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीची किंमत २,४४,९९९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. या किमतीच्या तुलनेत आज सोन्याचा दर १,२९५ रुपयांनी खाली आला. त्याचप्रमाणे चांदीची किंमत २,४४,९९९ रुपयांवरून घसरून २,३७,६५० रुपये प्रति किलो झाली आहे, म्हणजेच चांदीच्या दरात ७,३४९ रुपयांची घट झाली. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत 'कॉमेक्स'वर सोन्याचा भाव ५,०६३.८० डॉलर प्रति औंसवरून ५,००९.९० डॉलरवर आला, तर चांदी ७७.२७० डॉलर प्रति औंसवरून ७५.२३५ डॉलर प्रति औंसपर्यंत खाली आली.
ऑल टाइम हाय रेकॉर्डपासून सोन्या-चांदीची स्थिती
सोन्या-चांदीच्या किमतींनी २९ जानेवारी २०२६ रोजी आपला ऐतिहासिक उच्चांकी विक्रम प्रस्थापित केला होता. त्यावेळी सोन्याचा भाव १,८०,००० रुपये प्रति दहा ग्रॅम आणि चांदीचा भाव ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला होता. या ऐतिहासिक विक्रमाच्या तुलनेत सोनं आता २५,०९५ रुपये प्रति दहा ग्रॅमनं आणि चांदी १,८२,३५० रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली आहे. ही घसरण खरेदीदारांसाठी मोठा दिलासा मानली जात आहे.
दिल्ली, मुंबई आणि पाटण्यातील आजचे दर
देशातील प्रमुख शहरांमधील दरांचा विचार करता, दिल्लीत २४ कॅरेट सोन्याची किंमत १,५७,८९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा दर १,४४,७४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५७,७४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४४,५९० रुपये प्रति १० ग्रॅम इतका झालाय. तसंच पाटण्यात आज २४ कॅरेट सोन्याचा दर १,५७,७९० रुपये प्रति दहा ग्रॅमवर पोहोचला आहे.
Web Summary : Gold prices fell by ₹1,200, silver by ₹7,000+ on MCX. Gold trades at ₹1,54,905/10g, silver at ₹2,37,650/kg. Prices are significantly below record highs, offering relief to buyers in Delhi, Mumbai, Patna.
Web Summary : एमसीएक्स पर सोना ₹1200 और चांदी ₹7000 से ज्यादा गिरी। सोना ₹1,54,905/10 ग्राम, चांदी ₹2,37,650/किलो पर कारोबार कर रही है। कीमतें रिकॉर्ड ऊंचाई से काफी नीचे हैं, खरीदारों को राहत मिली है।