Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाजार उघडताच सोने सुस्साट...चांदीही वधारली; जाणून घ्या १८ ते २४ कॅरेट सोन्याचे ताजे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 11:34 IST

Gold-Silver Rate: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने-चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली.

Gold-Silver Rate: देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या दरात जोरदार तेजी पाहायला मिळाली. एमसीएक्स (MCX) वर सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमतीत ₹७५० हून अधिक वाढ झाली, तर चांदीच्या दरात जवळपास ₹३,८०० ची मोठी झेप दिसून आली.

MCX वर सोन्याचे दर वधारले

एमसीएक्सवर ५ जून डिलिव्हरीचे सोने मागील सत्रात प्रति १० ग्रॅम ₹१,५२,१३२ वर बंद झाले होते. ते बाजार उघडताच ते ₹१,५२,८८७ वर सुरू झाले. सुरुवातीच्या व्यवहारात सोन्याच्या किमतीत ₹७५५ ची वाढ होत दर ₹१,५२,८८७ पर्यंत पोहोचला. सकाळी ९:४० वाजता सोने ₹४७२ च्या वाढीसह ₹१,५२,६०४ प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत होते.

चांदीत मोठी झेप

चांदीच्या दरातही मोठी तेजी पाहायला मिळाली. ३ जुलै डिलिव्हरीची चांदी मागील सत्रात प्रति किलो ₹२,५३,२६५ वर बंद झाली होती. आज ती ₹२,५४,९९८ वर खुली झाली आणि सुरुवातीच्या व्यवहारात तब्बल ₹३,७९० ने वाढून ₹२,५७,०५५ प्रति किलोपर्यंत पोहोचली. सकाळी ९:४५ वाजता चांदी ₹२,५५,३०० प्रति किलो दराने व्यवहार करत होती.

सराफा बाजारातही दर वाढले

एमसीएक्सप्रमाणेच सराफा बाजारातही सोने-चांदीच्या किमती वाढल्या.

२४ कॅरेट सोने ₹३३० ने वाढून ₹१,५२,४६० प्रति १० ग्रॅमवर पोहोचले
२२ कॅरेट सोने ₹१,३९,७५० प्रति १० ग्रॅमवर पोहोचले
१८ कॅरेट सोने ₹१,१४,३४० प्रति १० ग्रॅमवर व्यवहार करत आहे

तर चांदीच्या दरात ₹५,००० ची वाढ होऊन ती ₹२,७०,००० प्रति किलोपर्यंत पोहोचली.

दरवाढीमागची प्रमुख कारणे काय?

बाजार तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी होण्याच्या शक्यता तसेच जागतिक ऊर्जा बाजारातील स्थिरतेचे संकेत यामुळे गुंतवणूकदारांचा कल पुन्हा सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहे. याशिवाय महागाईबाबतची चिंता काही प्रमाणात कमी झाल्याने आणि सुरक्षित गुंतवणुकीची मागणी वाढल्याने सोने-चांदीच्या किमतींना आधार मिळत आहे.

गुंतवणूकदारांसाठी काय संकेत?

तज्ज्ञांच्या मते, जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर पुढील काही दिवसांत सोने-चांदीच्या दरात आणखी चढ-उतार दिसू शकतात. त्यामुळे अल्पकालीन गुंतवणूकदारांनी सावध भूमिका घ्यावी, तर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी मौल्यवान धातूंना अजूनही सुरक्षित पर्याय मानले जात आहे.

(टीप- हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कुठल्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.)

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and silver prices surge as markets open: Details here.

Web Summary : Gold and silver prices soared in both domestic and international markets. MCX saw gold jump over ₹750, while silver surged nearly ₹3,800. Experts cite global uncertainty and safe-haven demand as drivers for the price increase.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक