Gold silver price today: आज(दि.४) आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या किमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. गुरुवारच्या तुलनेत सोमवारी सकाळपर्यंत सोने १,९०६ रुपयांनी स्वस्त झाले आहे. लग्नसराईच्या हंगामात सोन्याचे दर कमी झाल्याने भारतीयांना दिलासा मिळाला.
२४ कॅरेट सोन्याचा भाव काय...
इंडियन बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, २४ कॅरेट सोने ₹१,४८,३५७ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले, जे गुरुवारी ₹१,५०,२६३ प्रति १० ग्रॅमवर होते. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सुट्टीमुळे दर जाहीर झाले नव्हते.
२३ ते १४ कॅरेट सोन्याचे दर
आजच्या बुलियन मार्केटमधील दर पुढीलप्रमाणे:
- २३ कॅरेट: ₹१,४७,७६३ प्रति १० ग्रॅम
- २२ कॅरेट: ₹१,३५,८९५ प्रति १० ग्रॅम
- १८ कॅरेट: ₹१,११,२६८ प्रति १० ग्रॅम
- १४ कॅरेट: ₹८६,७८९ प्रति १० ग्रॅम
चांदीचे दर वाढले
सोन्याच्या उलट चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज चांदी (१ किलो) ₹२,४४,२३७ वर पोहोचली, जी गुरुवारी ₹२,४०,३३१ वर होती. म्हणजेच, म्हणजेच चांदीच्या किमतीत ₹३,९०६ ची वाढ झाली आहे.
सोने स्वस्त का झाले?
तज्ज्ञांच्या मते, कच्च्या तेलाच्या किमतीत झालेली वाढ, केंद्रीय बँकांकडून व्याजदर वाढीची शक्यता, डॉलर इंडेक्स मजबूत झाल्याने गुंतवणूकदारांचा कल डॉलरकडे आणि सोन्याने अलीकडे उच्चांक गाठल्यामुळे गुंतवणूक कमी झाल्याने सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे.
(टीप- ही गुंतवणुकीची शिफारस नाही. सोने आणि चांदीच्या किमती अनेक घटकांवर अवलंबून असतात. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Summary : Good news for buyers as gold prices dipped significantly, offering respite during the wedding season. 24 Carat gold fell by ₹1,906 per 10 grams. Silver prices, however, saw an increase. Experts cite various global economic factors for the gold price drop.
Web Summary : खरीदारों के लिए अच्छी खबर है क्योंकि विवाह सीजन के दौरान सोने की कीमतों में गिरावट आई है। 24 कैरेट सोना ₹1,906 प्रति 10 ग्राम गिरा। चांदी की कीमतों में हालांकि वृद्धि देखी गई। विशेषज्ञों ने सोने की कीमत में गिरावट के लिए विभिन्न वैश्विक आर्थिक कारकों का हवाला दिया।