Gold Silver Price Today: आजही सराफा बाजारात सोन्या-चांदीचे भाव नवीन विक्रमांसह गगनाला भिडले आहेत. सणासुदीच्या काळात आज २४ कॅरेट सोन्याचा भाव एकाच झटक्यात ₹१,३४३ नं वाढला आहे. त्याचबरोबर चांदीच्या भावानेही प्रति किलो ₹१,१८१ ची उसळी घेऊन नवा उच्चांक गाठलाय. २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटी वगळता ₹१,१३,४९८ प्रति १० ग्रॅमवर उघडला. तर चांदी जीएसटी वगळता ₹१,३४,०५० प्रति किलोवर उघडली. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आता ₹१,१६,९०२ प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव ₹१,३८,०७१ प्रति किलोवर पोहोचला आहे.
आयबीजेएच्या (IBJA) माहितीनुसार, शुक्रवारी जीएसटी वगळता सोन्याचा भाव ₹१,१२,१५५ वर बंद झाला होता. दुसरीकडे, जीएसटी वगळता चांदी ₹१,३२,८६९ प्रति किलोवर बंद झाली होती. आयबीजेए दिवसातून दोनदा भाव जाहीर करते - एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केले जातात.
वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
सप्टेंबरमध्ये सोन्याच्या दरात ₹११,११० ची वाढ
या सप्टेंबर महिन्यात सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹११,११० नं वाढला आहे, तर चांदीच्या दरात प्रति किलो ₹१६,४७८ ची वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरानुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव ₹१,०२,३८८ प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. तर चांदी ₹१,१७,५७२ प्रति किलोवर बंद झाली होती.
कॅरेटनुसार सोन्याचे आजचे भाव
२३ कॅरेट सोन्याचा भाव: २३ कॅरेट सोने ₹१,३३८ ने वाढून ₹१,१३,०४४ प्रति १० ग्रॅमनं उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता ₹१,१६,४३५ झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसच समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याचा दर: २२ कॅरेट सोन्याची किंमत ₹१,२३० नं वाढून ₹१,०३,९६४ प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह ही किंमत ₹१,०७,०८२ आहे.
१८ कॅरेट सोन्याची किंमत: १८ कॅरेट सोनं आज ₹१,००८ ने वाढून ₹८५,१२४ प्रति १० ग्रॅमवर उघडले आणि जीएसटीसह ₹८७,६७७ प्रति १० ग्रॅमवर पोहोचले.
१४ कॅरेट सोन्याचा भाव: १४ कॅरेट सोनं ₹७८५ ने महाग होऊन ₹६६,३९६ वर उघडले आणि आता जीएसटीसह ₹६८,३८७ वर पोहोचले आहे.
का वाढताहेत भाव?
केडिया कमोडिटीजचे अध्यक्ष अजय केडिया यांच्या मते, सोन्या-चांदीमधील ही वाढ सध्या थांबणार नाही. यामागे फेडचा रेट कट, डॉलरची कमजोरी, भू-राजकीय तणाव, अमेरिकेचा रोजगार डेटा, केंद्रीय बँकांची खरेदी आणि सणासुदीचा काळ ही प्रमुख कारणं आहेत. ईटीएफमध्ये (ETF) सतत खरेदी सुरू आहे. दरम्यान, भारतीय रुपयाची घसरण आणि देशांतर्गत शेअर बाजारातील सुस्त वातावरणामुळेही सोन्याच्या दरांना पाठिंबा मिळाला आहे.