Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोन्याच्या दरात जोरदार तेजी, चांदीचा दर २ लाखांच्या जवळ; एकाच झटक्यात २४०० रुपयांची तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 13:59 IST

Gold Silver Price Today 5 Dec: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. चांदीच्या दरात एका झटक्यात २४०० रुपयांची वाढ झाली.

Gold Silver Price 5 Dec: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठे बदल दिसून येत आहेत. चांदीच्या दरात एका झटक्यात २४०० रुपयांची वाढ झाली असून ती १७९०२५ रुपये प्रति किलो वर उघडली. जीएसटीसह चांदीची किंमत आता १८४३९५ रुपये प्रति किलो झाली आहे. गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटी वगळता चांदीचा भाव १७६६२५ रुपये प्रति किलो होता, तर सोन्याचा भाव जीएसटी वगळता १२७८४५ रुपये प्रति १० ग्रॅम होता.

आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १२८५७४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३२४३१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १२१३१० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९९३२७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे.

पहिल्याच दिवशी शेअरनं केला पैसा दुप्पट; गुंतवणूकदारांचा मिळालेला जबरदस्त प्रतिसाद; विजय केडियांचीही गुंतवणूक

सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या ऑल टाईम हाय (१३०८७४ रुपये) पेक्षा केवळ २३०० रुपये कमी आहे. तर, चांदीचा भाव आज ५ डिसेंबरला १७९०२५ रुपये प्रति किलो या विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जारी केले जातात.

कॅरेटनुसार सोन्याचे भाव

  • आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७३० रुपये वाढून १२८०६३ रुपये प्रति १० ग्रॅम वर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३१९०४ रुपये झाली आहे. यामध्ये अजून मेकिंग चार्ज जोडलेला नाही.
  • २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७१ रुपयांनी वाढून ११७७७७ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचली आहे. जीएसटीसह हा भाव १२१३१० रुपये झालाय.
  • १८ कॅरेट सोन्याचा भाव ५५० रुपयांच्या तेजीसह ९६४३४ रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९९३२७ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे.
  • १४ कॅरेट सोन्याच्या दरातही ४२९ रुपयांची वाढ झाली आहे. आज हा दर ७५२१८ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७७४७४ रुपयांवर आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices surge, silver nears ₹2 lakh; ₹2400 jump.

Web Summary : Gold and silver prices witnessed significant gains today. Silver jumped ₹2400 to ₹179025/kg (excluding GST). Gold's 24-carat rate opened at ₹128574/10 grams (excluding GST), nearing its all-time high. Prices vary based on gold purity.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक