Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold-Silver Rates: तुम्ही खरेदी केली होती का? अचानक ₹१५,००० नं वाढली चांदी; सोन्यातही जोरदार तेजी, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 11:09 IST

Gold-Silver Price On MCX: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेऊन जे ग्राहक खरेदी करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. पाहा काय आहेत लेटेस्ट दर.

Gold-Silver Price On MCX: गेल्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या किमतीत झालेल्या घसरणीचा फायदा घेऊन जे ग्राहक खरेदी करू शकले नाहीत, त्यांच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. विविध जागतिक कारणांमुळे सोनं आणि चांदीचे दर पुन्हा एकदा रॉकेटच्या वेगाने वाढू लागलेत. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी, सोमवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) व्यवहार सुरू होताच चांदीच्या दरात ५ टक्क्यांहून अधिक म्हणजे सुमारे १५,००० रुपये प्रति किलोची वाढ नोंदवण्यात आली. त्याचप्रमाणे सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली असून ते प्रति १० ग्रॅम ३,७०० रुपयांहून अधिक महागले. तरीही, या दोन्ही मौल्यवान धातूंचे दर त्यांच्या उच्चांकी पातळीपेक्षा अजूनही स्वस्त आहेत.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

चांदीच्या दरातील व्यवहार आणि साप्ताहिक वाढ

एमसीएक्स (MCX) वरील चांदीच्या दराबाबत बोलायचं झालं तर, ५ मार्चची मुदत संपणाऱ्या चांदीच्या वायदा व्यवहाराची सुरुवात होताच किंमत २,६८,१२० रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी, शुक्रवारी चांदी २,५२,९४४ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. अशा प्रकारे, सोमवारची बाजारपेठ उघडताच चांदीच्या भावात १५,१७६ रुपयांची वाढ झाली आहे. गेल्या आठवड्यातही चांदीच्या किमतीत मोठी वाढ पाहायला मिळाली होती आणि आठवडाभरात चांदी ८,५८४ रुपयांनी महागली होती.

ऐतिहासिक उच्चांकापासून अजूनही चांदी दीड लाखांनी स्वस्त

चांदीच्या किमतीत गेल्या आठवड्यापासून सुरू झालेली तेजी आजही कायम असली, तरी सध्याचा दर हा त्याच्या सार्वकालिक उच्चांकापेक्षा बराच कमी आहे. २९ जानेवारी रोजी चांदीनं प्रथमच ४ लाखांचा टप्पा ओलांडून ४,२०,०४८ रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता. मात्र, या पातळीनंतर किमतीत मोठी घसरण सुरू झाली आणि चांदी २.२५ लाख रुपयांपर्यंत खाली आली होती. आता सुरू असलेल्या दरवाढीनंतरही, चांदी तिच्या उच्चांकी दरापेक्षा अजूनही १,५१,९२८ रुपये प्रति किलोनं स्वस्त मिळत आहे.

सोन्याच्या दरातही ३,७०० रुपयांहून अधिक वाढ

चांदीप्रमाणेच सोन्याच्या दरातही सोमवारी मोठी उसळी पाहायला मिळाली. २ एप्रिलची मुदत संपणारा सोन्याचा वायदा दर शुक्रवारी १,५६,८७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाला होता. मात्र, सोमवारी बाजार उघडताच सोन्याचा दर थेट १,६०,६०० रुपयांवर पोहोचला. अशा प्रकारे अवघ्या काही वेळात सोन्याच्या किमतीत ३,७२४ रुपयांची वाढ झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold and Silver Prices Surge: Should You Have Bought?

Web Summary : Gold and silver prices surged on MCX due to global factors. Silver jumped by ₹15,000 per kg, and gold increased by ₹3,700 per 10 grams. Despite the rise, prices remain below their all-time highs.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक