Join us

Gold Silver Price Today : सराफा बाजारात सोन्याच्या दरात तेजी, चांदीची चमक झाली कमी; पाहा लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 14:51 IST

Gold Silver Price Today 13 January: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सोन्याच्या दरात मात्र मोठी वाढ झालीये. तर चांदीचे दर मात्र घसरलेत.

Gold Silver Price Today 13 January: आज शेअर बाजारात मोठी घसरण दिसून येत आहे. असं असलं तरी दुसरीकडे मात्र सोन्याच्या दरात मात्र मोठी वाढ झालीये. तर चांदीचे दर मात्र घसरलेत. १३ जानेवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ३३२ रुपये प्रति १० ग्रॅमनं वाढून ७८,३५० रुपये झाला. तर, चांदी ११८ रुपये प्रति किलोनं स्वस्त झाली आणि सरासरी ९०१५० रुपये प्रति किलो दराने उघडली. आपल्या उच्चांकी स्तरापेक्षा सोनं अजूनही १३३१ रुपयांनी तर चांदी ८१९० रुपयांनी स्वस्त आहे. ३० ऑक्टोबर २०२४ रोजी सोनं ७९,६८१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ९८,३४० रुपये प्रति किलो होती.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. यामध्ये १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

नवे दर काय?

आयबीजेएनं जाहीर केलेल्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ३३० रुपयांनी वाढून ७८,०३६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. २२ कॅरेट सोन्याचा भाव ३०४ रुपयांनी वाढून ७१,७६९ रुपये झाला आहे. १८ कॅरेट सोन्याचा दर सराफा बाजारात ६९,९९६ रुपये १० ग्राम झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १९४ रुपयांनी वाढून ४५,८३५ रुपये प्रति दहा ग्रॅम झाला आहे.

इतर शहरांमध्ये सोन्याचे दर

लाइव्ह मिंटवर दिलेल्या दरानुसार दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७९,८१३ रुपये आहे. तर जयपूरमध्ये सोन्याचा भाव ७९,८०६ रुपये आहे. आज दिल्लीत सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,९६० रुपये आहे. अमृतसरमध्ये आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,७६० रुपये आहे.

टॅग्स :सोनंचांदी