Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त; गोल्ड उच्चांकी स्तराहून ₹२३,०९९ नं तर, सिल्व्हर ₹१,६४,४०० नं खाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 10:18 IST

Gold Silver Rate Today: जागतिक आणि देशांतर्गत कमोडिटी बाजारात १६ मार्च २०२६ रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर?

Gold Silver Price Today: जागतिक आणि देशांतर्गत कमोडिटी बाजारात १६ मार्च २०२६ रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत घसरण पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीतही थोडी घट झाली, तरीही सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी परतताना दिसत नाहीये. MCX वर सोन्याचा भाव १,५६,९०१ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत २,५५,६०० रुपये प्रति किलो झाली आहे. आपल्या 'ऑल टाइम हाय' रेकॉर्डच्या तुलनेत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.

सोन्या-चांदीचे दर किती कमी झाले?

शुक्रवारी एमसीएक्सवर सोनं १,५८,४०० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २,५९,२४९ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज सोन्यात प्रति १० ग्रॅम १,४९९ रुपयांची, तर चांदीमध्ये प्रति किलो ३,६४९ रुपयांची घसरण झाली आहे. आपल्या आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीचा विचार केला, तर सोन्यात २३,०९९ रुपये आणि चांदीत १,६४,४०० रुपयांची मोठी घसरण झाली. २९ जानेवारी २०२६ रोजी सोन्याने १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीनं ४,२०,००० रुपये प्रति किलो असा ऐतिहासिक उच्चांक गाठला होता.

SBI मधून ₹७५ लाखांचं Home Loan घेण्यासाठी किती असली पाहिजी Salary, किती लागेल EMI?

दिल्लीतील आजचे ताजे भाव

राजधानी दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा भाव १,५९,३०० रुपये प्रति १० ग्रॅम, २२ कॅरेट सोन्याचा भाव १,४६,०५० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव २,७०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

भविष्यातील अंदाज

मध्य पूर्वेतील तणावामुळे 'मॅक्रो इकॉनॉमिक' घटकांचा सोन्या-चांदीच्या किमतीवर दबाव दिसून येत आहे. मात्र, कमोडिटी बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येणाऱ्या काळात सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा तेजी येईल. 'रिच डॅड, पुअर डैड'चे लेखक आणि गुंतवणूकदार रॉबर्ट कियोसाकी यांनी तर असं भाकीत केले आहे की, २०२६ मध्ये चांदीची किंमत २०० डॉलरपर्यंत पोहोचेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Drop: Significant fall from record highs.

Web Summary : Gold and silver prices fell sharply in commodity markets. Gold dropped ₹1,499 per 10 grams, silver ₹3,649 per kg. Despite a slight crude oil price decrease, prices are unlikely to rebound soon. Experts predict future gains, with some forecasting silver reaching $200 by 2026.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक