Join us

Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीचे दर आपटले, एकाच दिवसात Silver ₹२२६८ नं झालं स्वस्त; पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 14:33 IST

Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली होती. परंतु आता यात घसरण होताना दिसत आहे.

Gold Silver Price Today : दिवाळीपूर्वी आणि दिवाळीदरम्यान सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी तेजी दिसून आली होती. परंतु आता यात घसरण होताना दिसत आहे. आज सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव ७८,१०६ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जो मंगळवारच्या ७८,५६६ रुपयांच्या बंद भावापेक्षा ४६० रुपयांनी स्वस्त आहे. मात्र, आज चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. हा दर आयबीएनं जारी केलेला दर आहे, ज्यावर जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. आज चांदीचा भाव ९१,९९३ रुपये प्रति किलो होता.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर

आज, बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी २३ कॅरेट सोन्याचा भाव ४५८ रुपयांनी कमी होऊन ७७,७९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २४४ रुपयांनी कमी होऊन ७१,५४५ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव आज ३४५ रुपयांनी कमी झाला असून तो ५८,७८० रुपये प्रति १० ग्रॅम वर खुला झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २६९ रुपयांनी घसरून ४५,६९२ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) ही १०४ वर्षे जुनी संघटना आहे. आयबीजेए दिवसातून दोनदा दुपारी आणि संध्याकाळी सोन्याचे दर जाहीर करते. अर्थ मंत्रालय आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या विविध अधिसूचनेनुसार हे दर सॉवरेन आणि बॉन्ड जारी करण्यासाठी बेंचमार्क दर आहेत. आयबीजेएची २९ राज्यांमध्ये कार्यालये आहेत आणि ती सर्व सरकारी संस्थांचा भाग आहे.

टॅग्स :सोनंचांदी