Join us
Daily Top 2Weekly Top 5

एका झटक्यात चांदीच्या किमतीत ७७२५ रुपयांची तेजी, सोन्याच्या दरातही मोठी वाढ; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटचे लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2026 13:39 IST

Gold Silver Price 6 Jan 2026: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. खरेदीपूर्वी पटापट चेक करा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price 6 Jan 2026: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. चांदीच्या किमतीत जीएसटी वगळता ₹७,७२५ नं वाढ झाली असून, ती प्रति किलो २,४४,७८८ वर पोहोचली आहे, हा एक नवीन उच्चांक आहे. सोन्याच्या किमतीतही जीएसटीसह ₹७४१ नं वाढ झाली आहे. जीएसटीसह चांदीची किंमत आता प्रति किलो २,५२,१३१ झाली आहे. दरम्यान, जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा दर आता प्रति १० ग्रॅम १,४१,०१६ झाला आहे.

सोमवारी, चांदीचा भाव जीएसटीशिवाय २,३७,०६३ रुपयांवर बंद झाला. त्याचप्रमाणे, सोनं जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १,३६,१६८ रुपयांवर बंद झाले. आज सोनं जीएसटीशिवाय १,३६,९०९ रुपयांवर उघडले. जीएसटीशिवाय सोने २९ डिसेंबर २०२५ रोजीच्या १,३८,१८१ रुपयांच्या सर्वोच्च पातळीवरून १,२५२ रुपयांनी स्वस्त राहिलं आहे. तर, आज, ६ जानेवारी रोजी, जीएसटीशिवाय चांदीच्या दरानं २,४४,७८८ रुपयांचा सर्वोच्च पातळी गाठली.

हमालाच्या मुलानं उभी केली ₹४,५०० कोटींची कंपनी, आता दिग्गजाची ₹१५०० कोटींच्या भागीदारीची ऑफर, कसा होता प्रवास

हे दर आयबीजेएद्वारे जाहीर केले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा ५ वाजता दर जारी केले जातात.

कॅरेटनुसार सोन्याचे दर

  • १४ कॅरेट सोन्याच्या किमतीतही ४३४ रुपयांची वाढ झाली. आज ते ८०,०९२ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह ८२,४९४ रुपयांवर आहे.
  • १८ कॅरेट सोन्यात ५५६ रुपयांची वाढ झाली आहे. आता ते १०२,६८२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले आणि जीएसटीसह त्याची किंमत १०५,७६२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली आहे.
  • २२ कॅरेट सोन्याची किंमत ६७९ रुपयांनी वाढून १२५,४०९ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचली आहे. जीएसटीसह ती १२९,१७१ रुपयांवर आली.
  • २३ कॅरेट सोन्याच्या किंमतीत आज ७३८ रुपयांनी वाढ झाली आणि ते १३६,३६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडले. जीएसटीसह त्याची किंमत आता १४०,४५१ रुपये झाली. यामध्ये मेकिंग चार्जेस अद्याप समाविष्ट नाहीत.

English
हिंदी सारांश
Web Title : Silver surges ₹7725, gold rises sharply; check latest rates.

Web Summary : Gold and silver prices surged today. Silver jumped ₹7725 to ₹2,44,788 per kg (excluding GST), a new high. Gold increased ₹741 (with GST). 24-carat gold reached ₹1,41,016 per 10 grams (with GST).
टॅग्स :सोनंचांदी