Gold Silver Price 2 Jan 2026: या नवीन वर्षातही सोने-चांदीची चमक कायम आहे. आज चांदीचे भाव ५६५६ रुपयांनी वधारून २,३४,९०६ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोन्याच्या दरातही ९५४ रुपयांची तेजी नोंदवण्यात आली आहे. जीएसटीसह चांदी आता २,४१,९५३ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,३८,४४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर आहे.
गुरुवार १ जानेवारी रोजी चांदी विना जीएसटी २,२९,२५० रुपयांवर बंद झाली. तसंच सोनं विना जीएसटी १,३३,४६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज विना जीएसटी सोनं १,३४,४१५ रुपयांवर उघडलं. सोनं २९ डिसेंबर २०२५ च्या १३८१८१ च्या ऑल टाइम हाय पेक्षा ३७४६ रुपये स्वस्त झालं आहे. तर, चांदी २४३४८३ वरून ८५३२ रुपयांनी घसरली आहे.
हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जारी करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ वाजेच्या सुमारास आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजेच्या आसपास दर जारी केले जातात.
कॅरेटनुसार सोन्याचे भाव
आज २३ कॅरेट सोनेदेखील ९५० रुपयांनी वधारून १,३३,८७७ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावावर उघडले. जीएसटीसह याची किंमत आता १,३७,८९३ रुपये झाली आहे. अद्याप यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश नाही.
२२ कॅरेट सोन्याची किंमत ८७४ रुपयांनी महाग होऊन १,२३,१२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह हे १,२६,८१७ रुपये झालंय.
१८ कॅरेट सोनं ७१५ रुपयांच्या तेजीसह १,००,८११ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलंय आणि जीएसटीसह याची किंमत १,०३,८२५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
१४ कॅरेट सोन्याचा दरही ५५८ रुपयांनी वाढला आहे. आज हे ७८,६३३ रुपयांवर उघडले आणि जीएसटीसह हे ८०,९९१ रुपयांवर आलंय.
Web Summary : Gold and silver prices soared on January 2, 2026. Silver jumped ₹5656 to ₹2,34,906 per kg. Gold also saw a significant rise of ₹954 per 10 grams, reflecting continued market strength.
Web Summary : 2 जनवरी 2026 को सोना और चांदी की कीमतों में तेजी आई। चांदी ₹5656 बढ़कर ₹2,34,906 प्रति किलो हो गई। सोने में भी ₹954 प्रति 10 ग्राम की महत्वपूर्ण वृद्धि दर्ज की गई, जो बाजार की निरंतर मजबूती को दर्शाता है।