Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: सलग तिसऱ्या दिवशी चांदी आपटली; ₹१६ हजारांनी कमी झाली किंमत; सोनंही झालं स्वस्त, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 10:47 IST

Gold Silver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. आजच्या सुरुवातीच्या व्यवहारामध्ये चांदीच्या किमतीत सुमारे १६,००० रुपयांची घट झाली.

Gold Silver Price Today: सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली आहे. एमसीएक्स (MCX) वर आजच्या सुरुवातीच्या व्यवहारामध्ये चांदीच्या किमतीत सुमारे १६,००० रुपयांची घट झाली, तर सोन्याच्या किमतीतही ४,५०० रुपयांची घसरण झाली आहे. ५ मार्चच्या डिलिव्हरीची चांदी गेल्या सत्रात २,६५,६५२ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. आज ती २,६७,५०१ रुपयांवर उघडली असली तरी लवकरच दरात मोठी घट झाली. सकाळी ९:३० वाजता चांदी ६ टक्क्यांच्या घसरणीसह २,४९,७१३ रुपयांवर व्यवहार करत होती. गेल्या तीन दिवसांत चांदीच्या किमतीत १.५ लाख रुपयांहून अधिक घसरण झाली आहे.

सोन्याच्या किमतीतील बदल

चांदीसोबतच सोन्याच्या दरातही घट झाली आहे. २ एप्रिलच्या डिलिव्हरीचं सोनं सुमारे ४,५०० रुपये म्हणजेच ३ टक्क्यांनी घसरलं. गेल्या सत्रात सोनं १,४७,७५३ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं, जे आज १,४६,००० रुपयांवर उघडलं. सकाळी ९:३९ वाजता सोन्याचा दर ४,४३२ रुपयांच्या घसरणीसह १,४३,३२१ रुपयांवर होता. गेल्या सत्रात चांदी ९ टक्क्यांनी आणि सोने ३ टक्क्यांनी घसरून बंद झालं होतं.

१ ग्रॅम सोन्यात डेलिकेट अंगठ्या; १० रेखीव डिजाईन्स, सोन्याचे दर वाढण्याआधी पटकन खरेदी करा.

दर कमी होण्याची प्रमुख कारणं

आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील सोने आणि चांदीच्या किमती घसरल्या आहेत. स्पॉट गोल्ड ३.३ टक्क्यांच्या घसरणीसह ४,७०३.२७ डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत होतं. तसंच स्पॉट सिल्वर ५ टक्क्यांनी घसरून ८०.२८ डॉलर प्रति औंसवर आलं, जे गुरुवारी १२१.६४ डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचलं होतं. गुंतवणूकदारांनी केलेला नफावसुलीचा प्रयत्न आणि डॉलरची मजबूती यामुळे सोने-चांदीच्या किमतीत ही घट झाली आहे.

गुंतवणूकदारांसाठी तज्ज्ञांचा सल्ला

तज्ज्ञांच्या मते, सोने आणि चांदीच्या किमतीत मोठे चढ-उतार पाहायला मिळू शकतात. डॉलर इंडेक्समधील अस्थिरता आणि जागतिक तणावामुळे नजीकच्या भविष्यातही किमतींमध्ये उलथापालथ राहण्याची शक्यता आहे. एमसीएक्सवर सोन्यासाठी १,४४,४०० ते १,३७,७०० रुपयांवर सपोर्ट आणि १,४८,८०० ते १,५४,००० रुपयांवर रेजिस्टेंस पाहायला मिळू शकतो. चांदीसाठीची सपोर्ट रेंज २,५५,५०० ते २,४४,००० रुपये इतकी आहे. नवीन गुंतवणूक करण्यापूर्वी बाजार स्थिर होण्याची वाट पहावी, असा सल्ला गुंतवणूकदारांना देण्यात आला आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Plummet: Silver Drops ₹16,000, Gold Also Cheaper

Web Summary : Gold and silver prices fell for the third consecutive day. Silver prices dropped by ₹16,000 on MCX, while gold also saw a significant decrease of ₹4,500. Experts advise investors to wait for market stabilization before making new investments due to volatility.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक