Join us

Gold Silver Price Today 25 March: सोन्या-चांदीच्या दरात घसरण, आजही घसरले भाव; पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 15:02 IST

Gold Silver Price Today 25 March: लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today 25 March: लग्नसराईच्या हंगामापूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव १६० रुपयांनी घसरून ८७,५५९ रुपये झाला. तर चांदीच्या दरात २९ रुपयांनी घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ९७,३७९ रुपये प्रति किलो ग्रॅम होता. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. ३ टक्के जीएसटी जोडल्यास आज सोन्याचा भाव ९०,१८५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा दर १००२९९ रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचलाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जाहीर केला जातो.

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ३२३ रुपयांनी घसरून ८७,४९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी १ च्या सुमारास २९७ रुपयांनी घसरून ८०,४६६ रुपये झाला. तर दुसरीकडे १८ कॅरेट सोन्याचा भावही २४३ रुपयांनी स्वस्त होऊन ६५,८८४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १९० रुपयांनी कमी होऊन ५१३८९ रुपये झालाय.

११८१९ रुपयांनी सोनं महागलं

या घसरणीनंतरही मार्चमध्ये आतापर्यंत सोनं २५०३ रुपयांनी तर चांदी ३८९८ रुपयांनी वधारली आहे. २८ फेब्रुवारीला सोन्याचा भाव ८५,०५६ रुपये होता. तर चांदीचा भाव ९३,४८० रुपये आहे. वर्ष २०२५ बद्दल बोलायचं झालं तर या वर्षी आतापर्यंत सोनं ११,८१९ रुपये आणि चांदी ११,३६१ रुपयांनी महाग झालीये. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.

२० मार्च रोजी पहिल्यांदा सोन्याचा भाव ८८,७६१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला होता. तर १८ मार्च रोजी चांदीनं १००४०० रुपये प्रति किलोचा उच्चांक गाठला होता.

 

टॅग्स :सोनंचांदी