Join us

Gold Silver Price Today 16 Dec: सोन्या-चांदीच्या दरात बदल, आज 'इतका' कमी झाला सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 15:08 IST

Gold Silver Price Today 16 Dec: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. पाहा काय आहे नवा दर.

Gold Silver Price Today 16 Dec: सराफा बाजारात आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. आज २४ कॅरेट सोन्याचा भाव २८२ रुपयांनी कमी होऊन ७६६४० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीच्या दरात आज ७२६ रुपयांची घसरण झाली आहे. आज चांदीचा भाव ८९२५० रुपयांवर खुला झाला. आयबीजेएनं हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो.

देशभरात आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव २८१ रुपयांनी घसरून ७६३३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव २५९ रुपयांनी कमी होऊन ७०२०२ रुपये झालाय. तर १८ कॅरेट सोन्याचा भाव २१२ रुपयांनी घसरून ५७४८० रुपये झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १६५ रुपयांनी घसरून ४४८३४ रुपये झालाय.

लाइव्हमिंटनुसार, दिल्लीत आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८०५३ रुपये झालाय. काल सोन्याचा भाव ७९०३३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर गेल्या आठवड्यात तो ७७९६३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर दिल्लीत आज चांदीचा भाव ९५,५०० रुपये प्रति किलो झालाय. काल तो ९६५०० होता.

जयपूरमध्ये आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ७८,०४६ रुपये आहे. काल सोन्याचा भाव ७९०२६ रुपये प्रति १० ग्रॅम होता तर गेल्या आठवड्यात तो ७७९५६ रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर जयपूरमध्ये आज चांदीचा दर ९५,९०० रुपये प्रति किलो आहे. 

टॅग्स :सोनंचांदी