Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: यावर्षी सोनं ₹५२,७९५ आणि चांदी ₹१००९३६ रुपयांनी महागली; आजही दरानं तोडले सर्व विक्रम, पाहा किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 12:54 IST

Gold Silver Price 11 Dec : सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. गेल्या एका वर्षात चांदीनं १००९६९ रुपये प्रति किलोची मोठी झेप घेतली आहे.

Gold Silver Price 11 Dec : सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या भावांमध्ये मोठी तेजी दिसून येत आहे. चांदीचा भाव आज ६३६ रुपयांनी वाढून १८६९८६ रुपये प्रति किलोच्या विक्रमी उच्चांकावर उघडला आणि जीएसटीसह याची किंमत १९२५९५ रुपये प्रति किलोवर पोहोचली. गेल्या एका वर्षात चांदीनं १००९६९ रुपये प्रति किलोची मोठी झेप घेतली आहे.

बुधवारी बाजार बंद झाला तेव्हा जीएसटी वगळता चांदीचा भाव १८६३५० रुपये प्रति किलो आणि सोन्याचा भाव जीएसटी वगळता १२७७८८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. आज २४ कॅरेट सोनं ७४७ रुपयांनी महाग होऊन १२८५३५ रुपयांवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १३२३९१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली आहे. या वर्षात आतापर्यंत सोने ५२७९५ रुपयांनी वाढलं आहे.

₹२,९५४ च्या गुंतवणूकीवर ₹१२,८०१ चा रिटर्न; गुंतवणूकदारांना कुठे मिळतोय ४ पट पैसा, जाणून घ्या

२२ कॅरेट सोन्याचा भाव आज जीएसटीसह १२१२७० रुपये आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव ९९२९३ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला. सोन्याचा आजचा भाव १७ ऑक्टोबरच्या ऑल टाइम हाय (१३०८७४ रुपये) पेक्षा केवळ २३३९ रुपये कमी राहिला आहे, तर चांदीचा भाव आज नव्या ऑल टाइम हाय (१८६९८६ रुपये किलो) वर पोहोचला आहे. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरा संध्याकाळी ५ च्या आसपास दर जाहीर केले जातात.

कॅरेटनुसार सोन्याचे भाव

आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ७४४ रुपयांनी वाढून १२७२७६ रुपये प्रति १० ग्रॅमच्या भावावर उघडला. जीएसटीसह याची किंमत आता १३११६० रुपये झाली आहे. यात मेकिंग चार्ज जोडलेला नाही.

२२ कॅरेट सोन्याची किंमत ६८४ रुपयांनी वाढून ११७७३८ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे. जीएसटीसह हा भाव १२१२७० रुपये झालाय.

१८ कॅरेट सोन्याचा भाव ५६० रुपयांच्या वाढीसह ९६४०१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे आणि जीएसटीसह याची किंमत ९९२९३ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

१४ कॅरेट सोन्याचा दरही ४३७ रुपयांनी घसरला. आज हा दर ७५१९३ रुपये वर उघडला आणि जीएसटीसह तो ७७४४८ रुपयांवर आला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Soar: New Records Set, Huge Gains This Year

Web Summary : Gold and silver prices surged, hitting new records. Silver rose significantly, reaching ₹192595 per kg with GST. Gold also saw a substantial increase, with 24-carat gold priced at ₹132391 per 10 grams, including GST. This year, gold has increased by ₹52795.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक