Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Silver Price Today: नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, चेक करा १८ ते २४ कॅरेट सोन्याचे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 13:27 IST

Gold Silver Price Today: नवीन वर्षाची सुरुवात सोने-चांदीच्या दरातील घसरणीसह झाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर.

Gold Silver Price Today: नवीन वर्षाची सुरुवात सोने-चांदीच्या दरातील घसरणीसह झाली. आज चांदीचे भाव २५२० रुपयांनी घसरून २,२७,९०० रुपये प्रति किलोवर आले. सोन्याच्या भावात मात्र केवळ ४४ रुपयांची घसरण झाली आहे. जीएसटीसह चांदी आता २,३४,७३७ रुपये प्रति किलोवर आली आहे. तर, २४ कॅरेट सोन्याचा दर आता जीएसटीसह १,३७,१४५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.

बुधवारी चांदी जीएसटीशिवाय २,३०,४२० रुपयांवर बंद झाली होती. त्याचप्रमाणे सोने जीएसटीशिवाय १,३६,७८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आज विना जीएसटी सोनं १,३३,१९५ रुपयांवर उघडलं. सोनं २९ डिसेंबर २०२५ च्या १३८,१८१ रुपयांच्या 'ऑल टाइम हाय' पातळीवरून ५,०१० रुपयांनी स्वस्त झालंय. तर चांदी २,४३,४८३ रुपयांवरून १५,५३८ रुपयांनी घसरली आहे. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आले आहेत. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसऱ्यांदा ५ वाजेच्या सुमारास दर जाहीर केले जातात.

टॅरिफमुळे US ची किती कमाई? "टीका करणारे मुर्ख" असं म्हणणारे ट्रम्प प्रत्येकाला $२००० देण्याचं वचन पूर्ण करणार का?

कॅरेटनुसार सोन्याचे भाव

२३ कॅरेट सोनं: आज २३ कॅरेट सोनंदेखील ४४ रुपयांनी घसरून १,३२,६१८ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह याची किंमत आता १,३६,५९६ रुपये झाली आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्जेस जोडलेले नाहीत.

२२ कॅरेट सोनं: २२ कॅरेट सोन्याची किंमत ४१ रुपयांनी घसरून १,२१,९६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह हा दर १,२५,६२४ रुपये आहे.

१८ कॅरेट सोनं: १८ कॅरेट सोनं ३३ रुपयांच्या घसरणीसह ९९,८६३ रुपये प्रति १० ग्रॅमवर आलं आहे आणि जीएसटीसह याची किंमत १,०२,८५८ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.

१४ कॅरेट सोनं: १४ कॅरेट सोन्याचा दरही २६ रुपयांनी घसरला आहे. आज हे सोनं ७७,८९३ रुपयांवर उघडलं आणि जीएसटीसह ८०,२२९ रुपयांवर आलं.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Drop on New Year's Day: Check Rates

Web Summary : Gold and silver prices fell on the first day of the new year. Silver dropped significantly, while gold saw a slight decrease. Check the latest rates for 18 to 24-carat gold.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक