Gold Silver Price On MCX: सोन्या-चांदीचे दर सध्या केवळ गुंतवणूकदारांमध्येच नाही तर सामान्य जनतेमध्येही चर्चेचा विषय बनले आहेत. या आठवड्याच्या शेवटच्या व्यापारी दिवशी, म्हणजेच ६ फेब्रुवारी २०२६, शुक्रवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या किमतीत घट नोंदवण्यात आली. आंतरराष्ट्रीय कमोडिटी बाजारातही आज अशीच परिस्थिती असून 'कॉमेक्स'वर सोन्या-चांदीच्या दराची सुरुवात कमकुवत झाली. या आठवड्यात मंगळवारी आणि बुधवारी दोन्ही धातूंच्या किमतीत वाढ झाली होती, मात्र गुरुवारी ही तेजी पुन्हा घसरणीत बदलली.
MCX वरील सोन्या-चांदीच्या किमतीत घट
गुरुवारी MCX वर सोनं १,५२,२६० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी २,४६,४५२ रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. मात्र, आज बाजार उघडल्यानंतर सोन्याचा भाव १,७२६ रुपयांच्या घसरणीसह १,५०,५३४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. त्याचप्रमाणे, चांदीचा भावही १४,१२४ रुपयांनी घसरून २,३२,३२८ रुपये प्रति किलोवर पोहोचला.
रेपो दर 'जैसे थे'; EMI आणखी कमी होण्यासाठी वाट पाहावी लागणार; काय म्हणाले RBI गव्हर्नर?
जानेवारीतील विक्रमी उच्चांकावरून मोठी घसरण
सोन्या-चांदीच्या किमतींनी २९ जानेवारी २०२६ रोजी आपला आतापर्यंतचा सर्वोच्च स्तर (All Time High) गाठला होता. त्यावेळी सोन्याचा भाव १,८०,००० रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदी ४,२०,००० रुपये प्रति किलोवर पोहोचली होती. सध्याच्या दरांचा विचार करता, सोनं आपल्या उच्चांकी पातळीवरून २९,४६६ रुपयांनी खाली आलेत. तर चांदीमध्ये मोठी घट झाली असून ती आपल्या उच्चांकी स्तरापेक्षा १,८७,६७२ रुपयांनी स्वस्त झाली आहे.
सर्वसामान्यांना मोठा दिलासा
सोन्या-चांदीच्या किमतीत होणारी ही घसरण गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब असली तरी, लग्नसराईच्या काळात सामान्य जनतेला यामुळे मोठा दिलासा मिळत आहे. गेल्या वर्षापासून सोन्या-चांदीचे दर सतत वाढत होते, तेव्हापासून सामान्य नागरिक, विशेषतः मध्यमवर्गीय कुटुंबे दरामध्ये मोठ्या घसरणीची वाट पाहत होती.
Web Summary : Gold and silver prices fell sharply on MCX, mirroring international market trends. Silver plummeted by ₹14,124 to ₹2,32,328 per kg after hitting record highs in January. This price drop offers relief to consumers during the wedding season.
Web Summary : एमसीएक्स पर सोना और चांदी की कीमतों में भारी गिरावट आई, जो अंतरराष्ट्रीय बाजार के रुझानों को दर्शाती है। जनवरी में रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंचने के बाद चांदी ₹14,124 गिरकर ₹2,32,328 प्रति किलो हो गई। कीमतों में यह गिरावट शादी के मौसम में उपभोक्ताओं को राहत प्रदान करती है।