Gold Silver Price Today 28 Feb: लग्नसराईचा हंगामादरम्यान आज फेब्रुवारी महिन्याच्या अखेरच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. आज २८ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७९ रुपयांनी घसरून ८५,११४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला.
दुसरीकडे चांदी १४४४ रुपयांनी स्वस्त झाली आणि आज ९३,६०१ रुपये प्रति किलोवर उघडली. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडू शकतो.
आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव ४७९ रुपयांनी घसरून ८४,७७१ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ही ४३९ रुपयांनी कमी होऊन ७७,७९६ रुपये झाला आहे. १८ कॅरेटचा भाव ३५९ रुपयांनी वाढून ६३,८३६ रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता २८० रुपयांनी कमी होऊन ४९,७९२ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.
फेब्रुवारीमध्ये ३,०२८ रुपयांची वाढ
या घसरणीनंतरही फेब्रुवारीमध्ये सोन्याच्या किंमतीत आतापर्यंत ३०२८ रुपयांची वाढ झाली आहे. कारण, ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा दर ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. या वर्षीचा विचार केला तर २०२५ मध्ये आतापर्यंत सोनं ९३७४ रुपयांनी तर चांदी ७५८४ रुपयांनी महागली आहे. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलोग्रॅमवर बंद झाली.