Gold-Silver Rate Fall : गेल्या वर्षभरात (२०२५) नवनवे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या सोन्या-चांदीच्या दरांना नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच मोठी गळती लागली आहे. सरत्या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेली ही घसरण २०२६ च्या पहिल्या आठवड्यातही कायम असून, अवघ्या सात दिवसांत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४,१२१ रुपयांनी कोसळले आहेत. चांदीमध्येही प्रति किलो ३,१०० रुपयांहून अधिक घट झाल्याने सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.
सोन्याच्या किमतीत 'फ्री-फॉल'मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याच्या दरात अनपेक्षित रित्या मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. २६ डिसेंबर २०२५ रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव १,३९,८७३ रुपये प्रति १० ग्रॅम होता, जो शुक्रवारी (२ जानेवारी २०२६) १,३५,७५२ रुपयांवर स्थिरावला. सोन्याने १,४०,४५६ रुपयांचा 'लाईफ टाइम हाय' स्तर गाठला होता. त्या तुलनेत आता सोने ४,७०४ रुपयांनी स्वस्त मिळत आहे. घरगुती बाजारातही सोन्याचे भाव १,३७,९५६ रुपयांवरून घसरून १,३४,७८२ रुपये झाले आहेत. लग्नसराईच्या तोंडावर झालेली ही घसरण सर्वसामान्य ग्राहकांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरत आहे.
चांदीची झळाळीही ओसरलीसोन्यापाठोपाठ चांदीच्या दरातही मोठी घसरण सुरू आहे. गेल्या एका आठवड्यात चांदीच्या किमतीत ३,१८८ रुपयांची*घट झाली आहे. २६ डिसेंबर रोजी एक किलो चांदीचा दर २,३९,७८७ रुपये होता, तो आता २,३६,५९९ रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे, चांदीने गाठलेल्या २,५४,१७४ रुपयांच्या उच्चांकी स्तराचा विचार केल्यास, चांदी सध्या तब्बल १७,५७५ रुपयांनी स्वस्त आहे.
वाचा - झोमॅटो दरमहा २ लाख लोकांना रोजगार देते, तर तवेढच लोक नोकरीही सोडतात; गोयल यांनी सांगितलं कारण
घसरणीची कारणे काय?बाजार तज्ज्ञांच्या मते, जागतिक बाजारपेठेत डॉलर वधारल्यामुळे आणि वर्षाच्या सुरुवातीला गुंतवणूकदारांनी केलेल्या नफेखोरीमुळे ही घसरण झाली आहे. तसेच, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या आगामी धोरणांकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे.
Web Summary : Gold and silver rates have fallen sharply. Gold decreased by ₹4,121 per 10 grams, and silver decreased by ₹3,100 per kg in a week due to global factors.
Web Summary : सोने और चांदी की दरों में भारी गिरावट आई है। वैश्विक कारकों के कारण एक सप्ताह में सोने में ₹4,121 प्रति 10 ग्राम और चांदी में ₹3,100 प्रति किलोग्राम की गिरावट आई है।