सराफा बाजारात आज सोन्याच्या भावात घसरण झाली आहे, पण चांदीच्या दरात मात्र मोठी वाढ झाली. सणासुदीच्या काळात आज २४ कॅरेट सोनं केवळ ५० रुपये प्रति १० ग्रॅमनं स्वस्त झाले आहे. दुसरीकडे, चांदीच्या किमतीत गुरुवारी बंद झालेल्या दराच्या तुलनेत आज ४२७ रुपये प्रति किलोनं वाढ झाली आहे.
सराफा बाजारात सोने आज जीएसटी वगळता १,१३,२९९ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडले. तर, चांदी जीएसटी वगळता १,३७,४६७ रुपये प्रति किलोवर उघडली.
जीएसटीसह सोन्या-चांदीचे आजचे दर (मेकिंग चार्ज वगळून):
२४ कॅरेट सोनं: १,१६,६९७ रुपये प्रति १० ग्रॅम
चांदी: १,४१,५९१ रुपये प्रति किलो
आयबीजेए (IBJA) नुसार, गुरुवारी सोनं जीएसटी वगळता १,१३,३४९ रुपयांवर बंद झाले होते. दुसरीकडे, चांदी जीएसटी वगळता १,३७,०४० रुपये प्रति किलोवर बंद झाली होती. IBJA दिवसातून दोन वेळा दर जारी करते, एकदा दुपारी १२ च्या सुमारास आणि दुसरे ५ च्या आसपास दर जारी केले जातात.
सप्टेंबर महिन्यात मोठी वाढ
या सप्टेंबर महिन्यात सोनं १०,९११ रुपये प्रति १० ग्रॅमनं महाग झालं आहे. तर, चांदीच्या किमतीत प्रति किलो १९,८९५ रुपयांची मोठी वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरानुसार ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोनं १,०२,३८८ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं बंद झालं होतं आणि चांदी १,१७,५७२ रुपये प्रति किलो दराने बंद झाली होती.