Join us

Gold Silver Price 24 June: एका झटक्यात सोनं झालं ₹२ हजारांपेक्षाही स्वस्त; Iran-Israel युद्ध थांबलं तर चांदीचीही चमक झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 16:08 IST

Gold Silver Price 24 June: इराण-इस्रायल युद्ध थांबताच सोन्या-चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली. पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर.

Gold Silver Price 24 June: इराण-इस्रायल युद्ध थांबताच सोन्या-चांदीचे दर घसरण्यास सुरुवात झाली. सराफा बाजारात आज म्हणजेच मंगळवार, २४ जून रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव २०६० रुपयांनी घसरून ९७,२८८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. चांदीच्या दरात मात्र ११६५ रुपयांनी घसरण होऊन ती १०५८९८ रुपये प्रति किलो झाली आहे. जीएसटीमुळे २४ कॅरेट सोन्याची किंमत १००२०६ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीची किंमत १०९०७४ रुपये प्रति किलो झालीये.

२२ कॅरेटचा दर काय?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील २०५२ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९६,८९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत १८८५ रुपयांनी कमी झाली आणि ती ८९,११६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमत देखील १५४५ रुपयांनी स्वस्त झाली आणि ती ७२,९६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​आली आहे. तर, १४ कॅरेट सोन्याची किंमत १२०६ रुपयांनी कमी होऊन ५६९१३ रुपये झाली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाहीत.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीचे स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

टॅग्स :सोनंचांदी