Gold Silver Price Today 17 Dec: सराफा बाजारात आज चांदीच्या दरानं इतिहास रचला असून प्रति किलो किंमत २ लाख रुपयांच्या पार पोहोचली आहे. चांदीच्या भावात एका झटक्यात ८,७७५ रुपयांची वाढ झाली असून, जीएसटीशिवाय चांदी २,००,७५० रुपये प्रति किलो दरानं उघडली. जीएसटीसह चांदीचा दर आता २,०६,७७२ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
चांदीसोबतच सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ९३६ रुपयांनी वधारून १,३२,७१३ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह ग्राहकांना आता १० ग्रॅम सोन्यासाठी १,३६,६९४ रुपये मोजावे लागणार आहेत.
वर्षभरातील दरवाढ आणि सध्याची स्थिती
मंगळवारी बाजार बंद होताना जीएसटीशिवाय चांदी १,९१,९७५ रुपये प्रति किलो आणि सोनं १,३१,७७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर होते. या वर्षाचा विचार केला असता, सोन्याच्या किमतीत आतापर्यंत ५६,९७३ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी तब्बल १,१४,७३३ रुपयांनी महागली आहे. सध्या चांदी आपल्या 'ऑल टाइम हाय' म्हणजेच ऐतिहासिक उच्चांकी स्तरावर आहे.
चांदी ३ लाखांपर्यंत पोहोचणार?
'व्हेंचुरा'चे हेड ऑफ कमोडिटी, एन.एस. रामास्वामी यांच्या मते, चांदीचा पुरवठा कमी असल्यानं आणि वाढत्या मागणीमुळे किमती अजून वर जाऊ शकतात. चांदी १०० डॉलर प्रति औंस म्हणजेच सुमारे ३ लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र, गुंतवणूकदारांना सावध करताना त्यांनी सांगितलं की, मोठ्या तेजीनंतर अनेकदा चांदीच्या दरात मोठी घसरणही पाहायला मिळते. जेव्हा पुरवठा मागणीच्या बरोबरीनं होईल, तो चांदीचा सर्वोच्च स्तर असेल.
कॅरेटनुसार सोन्याचे नवे दर (प्रति १० ग्रॅम)
सोन्याच्या विविध प्रकारांनुसार आजचे बाजारभाव खालीलप्रमाणे आहेत:
२३ कॅरेट सोनं: ९३३ रुपयांच्या वाढीसह १,३२,१८२ रुपये (जीएसटीसह १,३६,१४७ रुपये).
२२ कॅरेट सोनं: ८५७ रुपयांच्या वाढीसह १,२१,५६५ रुपये (जीएसटीसह १,२५,२११ रुपये).
१८ कॅरेट सोनं: ७०२ रुपयांच्या तेजीसह ९९,५३५ रुपये (जीएसटीसह १,०२,५२१ रुपये).
१४ कॅरेट सोनं: ५४७ रुपयांच्या वाढीसह ७७,६३७ रुपये (जीएसटीसह ७९,९६६ रुपये).
टीप: वरील किमतींमध्ये ज्वेलर्सचे मेकिंग चार्जेस समाविष्ट नाहीत. हे दर आयबीजेएनं (IBJA) द्वारे जाहीर करण्यात आलेत. आयबीजेए दिवसातून दोन वेळा दर जाहीर करते.
Web Summary : Silver hits a record high of ₹2 lakh/kg, gold surges too. 24 Carat gold reached ₹1,32,713 per 10 grams. Experts predict silver may reach ₹3 lakh, but caution about potential price drops. Consider market conditions before investing.
Web Summary : चांदी ₹2 लाख/किलो के रिकॉर्ड उच्च स्तर पर, सोना भी उछला। 24 कैरेट सोना ₹1,32,713 प्रति 10 ग्राम पर पहुंचा। विशेषज्ञों का अनुमान है कि चांदी ₹3 लाख तक पहुंच सकती है, लेकिन संभावित मूल्य गिरावट के बारे में सावधानी बरतें। निवेश से पहले बाजार की स्थितियों पर विचार करें।