Join us

Gold Silver Price 16 May: चांदीनं रचला इतिहास, किंमत ₹८६००० जवळ; सोन्याच्या किंमतीतही तेजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2024 13:27 IST

Gold Silver Price 16 May: सराफा बाजारात आज चांदीच्या दरानं इतिहास रचला आहे. आज चांदीचा भाव 1195 रुपयांनी वधारला. तर सोन्याच्या दरातही मोठी वाढ झाली.

Gold Silver Price 16 May: सराफा बाजारात आज चांदीच्या दरानं इतिहास रचला आहे. आज चांदीचा भाव 1195 रुपयांनी वधारून 85700 रुपये प्रति किलो झाला आहे. तर, सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 73476 रुपयांवर पोहोचला आहे. चेन्नई, कानपूर, दिल्ली, बरेली, एटा, कोलकाता, लुधियाना, चंदीगड, गोरखपूर, इंदूर, अहमदाबाद, आग्रा, जयपूर, लखनौ ते कन्याकुमारी पर्यंत सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. 

सराफा बाजारात आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 542 रुपयांनी वधारून 73476 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. चांदीचा भाव मात्र 1195 रुपयांनी वाढून 85700 रुपये प्रति किलो झाला आहे. यापूर्वी बुधवारी सोनं 72934 रुपये आणि चांदी 84505 रुपयांवर बंद झाली होती. 

19 एप्रिल रोजी उच्चांकी पातळी 

19 एप्रिल 2024 रोजी सोने 73596 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर होतं. तर चांदीनं 15 मे 2024 रोजी 84505 रुपयांचा उच्चांक मोडला आणि आज 85700 चा नवा उच्चांक गाठला. आयबीजेएच्या ताज्या दरानुसार, सोमवारी, 16 मे रोजी 23 कॅरेट सोन्याचा भाव 540 रुपयांनी वाढून 73182 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव 496 रुपयांनी वाढून 67304 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा भाव 496 रुपयांनी वाढून 45107 रुपये झाला. तर 14 कॅरेट सोन्याचा भाव 318 रुपयांनी वाढून 42984 रुपये झाला आहे. 

जीएसटीसह सोने-चांदीचे दर 

जीएसटीसह 22 कॅरेटची किंमतही 69323 रुपये प्रति दहा ग्रॅम होईल. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि नफा जोडल्यानंतर 22 कॅरेट सोन्याचे दागिनेही जवळपास 76255 रुपयांपर्यंत पोहोचत आहेत. मात्र जीएसटीसह 18 कॅरेट सोन्याची किंमत 56760 रुपये असेल. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि नफा जोडल्यास ते 62436 रुपये होतात. 

24 कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह 75680 रुपये प्रति 10 ग्रॅम असेल. ज्वेलरी मेकिंग चार्जेस आणि नफा जोडल्यास त्याची किंमत 83248 रुपयापर्यंत जाते. जीएसटीसह 23 कॅरेट सोन्याचा भाव 75,377 रुपये प्रति 10 ग्रॅम होईल. इतर शुल्कांसह ते 82915 रुपयांच्या जवळपास असेल. 

सोन्या-चांदीचे दर हे आयबीजेए द्वारे जारी करण्यात येतात. त्यात जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसचा समावेश नसतो. तुमच्या शहरात सोन्या-चांदीच्या दरात 1000 ते 2000 रुपयांपर्यंतचा फरक असू शकतो.

टॅग्स :सोनंचांदी