गगनाला भिडल्यानंतर आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. तर सोन्याच्या किमतीत मोठा बदल दिसून येत आहे. सराफा बाजारात आज एका झटक्यात चांदी १८६७ रुपयांनी स्वस्त झाली. दरम्यान, त्याची किंमत अजूनही १,१२,००० रुपये प्रति किलो झालीये. तर सोन्याची किंमतही ३३९ रुपयांनी घसरून ९७,९६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. आज, मंगळवार, १५ जुलै रोजी, २४ कॅरेट सोने जीएसटीसह १,००,९०२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकलं जात आहे, तर चांदी १,१५,३६० रुपये प्रति किलो दरानं विकली जात आहे.
आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ३३७ रुपयांनी स्वस्त झाले आणि ते ९७,५७२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,००,४९९ रुपये आहे. त्यात मेकिंग चार्जेसचा समावेश नाही. दागिन्यांसाठी जारी केलेल्या दरांबद्दल बोलायचं झालं तर, २२ कॅरेट सोन्याची किंमत ८९,७३५ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जीएसटीसह ती ९२,४२७ रुपये आहे. आज १८ कॅरेट सोन्याची किंमत ७३,४७३ रुपये आहे आणि जीएसटीसह ती ७५,६७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.
सोने आणि चांदीचे स्पॉट रेट इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जाहीर केले जातात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.