Join us

Gold Silver Price 1 January: नववर्षाच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या किंमतीत तेजी, चांदी चमक झाली कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 14:45 IST

Gold Silver Price 1 January: वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारीला सराफा बाजारात सोन्या दरात वाढ झाली. पाहा काय आहेत सोन्या-चांदीचे दर.

Gold Silver Price 1 January: वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारीला सराफा बाजारात सोन्या दरात वाढ झाली. आज, बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ३७२ रुपयांनी वाढून ७६,५३४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात आज ११७ रुपयांची घसरण झाली. आज चांदीचा भाव सरासरी ८५,९०० रुपयांवर खुला झाला. आयबीजेएनं हा दर जाहीर केलाय. ज्यामध्ये जीएसटीचा समावश नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडू शकतो.

आज सोन्याचा भाव वाढला असला तरी सोनं आपल्या ऑल टाईम हायपेक्षा ३१४७ रुपयांनी तर चांदी १२४४० रुपयांनी स्वस्त झाली आहे. आज २३ कॅरेट सोन्याचा सरासरी भाव ३७१ रुपयांनी वाढून ७६,२२८ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा भाव ३४१ रुपयांनी वाढून ७०,१० ५ रुपये झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव २७९ रुपयांनी वाढून ५७,४०१ रुपये झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव २१७ रुपयांनी वाढून ४४,७७२ रुपये झालाय.

खरेदीच्या वेळी याकडे लक्ष ठेवा

किंमत तपासा - ज्या दिवशी तुम्हाला खरेदी करायची आहे, त्या दिवशी इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या (https://www.ibja.co/) वेबसाईटवर जाऊन त्या दिवसाची किंमत जाणून घ्या. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचा भाव वेगवेगळा आहे.

वजन तपासा - दागिन्यांच्या वजनाकडे विशेष लक्ष द्या. त्यात थोडासा फरक असेल तर किंमतीत मोठा फरक पडू शकतो. हे टाळण्यासाठी तुम्ही ज्वेलर्सकडून सर्टिफिकेटही मागू शकता.

पक्कं बिल घ्या - हॉलमार्क केलेलं सोनं घेण्यासोबतच खरेदीचं पक्कं बिल घ्या. बिलात प्रत्येक वस्तूचं वर्णन, निव्वळ वजन, कॅरेटमधील शुद्धता आणि हॉलमार्किंग शुल्क आवश्यक आहे.

मेकिंग चार्जेसबाबत बोला - या शुल्काबाबत कोणतीही सरकारी मार्गदर्शक तत्त्वं नाहीत आणि म्हणूनच ज्वेलर्स त्यांच्या किंमतीच्या २ ते २० टक्के शुल्क आकारतात. त्यामुळे मेकिंग चार्जबाबत नक्की चर्चा करा. असं केल्यावर ज्वेलर्स त्यात थोडी सूट देऊ शकतात.

टॅग्स :सोनंचांदी