Gold Silver Price Today 29 Jan: लग्नांचा हंगाम सुरू होण्यापूर्वीच सराफा बाजारात सोन्या-चांदीची विक्रमी घोडदौड सुरू आहे. सोन्या-चांदीनं जुने सर्व रेकॉर्ड मोडीत काढत नवीन शिखर गाठलंय. बुधवारी असलेल्या बंद भावाच्या तुलनेत, २४ कॅरेट सोन्याच्या दरात आज ११,४८६ रुपयांची प्रचंड वाढ झाली आहे. तर चांदीनं २७,६६६ रुपयांची मोठी उडी घेतली आहे. या दरवाढीनंतर जीएसटीसह चांदीचा भाव ३,९७,५१० रुपये प्रति किलोवर पोहोचला, तर २४ कॅरेट सोन्याचा दर जीएसटीसह १,८१,४०४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. प्लॅटिनमच्या दरातही ६,७५० रुपयांची वाढ होऊन तो ८९,९९० रुपयांवर पोहोचला आहे.
IBJA ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या केवळ ४ कामकाजाच्या दिवसांत चांदी ८,६२२ रुपयांनी तर सोनं २४,९९३ रुपयांनी महागलं आहे. या वर्षाच्या सुरुवातीच्या २९ दिवसांचा विचार केल्यास, चांदी १,९३,९०८ रुपयांनी तर सोन्याचा भाव ३८,०४४ रुपयांनी वाढला आहे.
भारत ईयू डीलमध्ये पाकिस्तानचा मित्र तुर्कीला मोठा झटका; पाहा नक्की काय झालं, जाणून घ्या
सोन्याचे कॅरेटनुसार सुधारित दर (जीएसटीसह)
२३ कॅरेट गोल्ड: ११,४४० रुपयांच्या वाढीसह जीएसटीसह याचा भाव १,८०,६७८ रुपये झाला आहे.२२ कॅरेट गोल्ड: १०,५२१ रुपयांनी महाग होऊन जीएसटीसह याचा दर १,६६,१६६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला.१८ कॅरेट गोल्ड: ८,६१५ रुपयांच्या तेजीसह जीएसटीसह हा दर १,३६,०५३ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.१४ कॅरेट गोल्ड: ६,७१९ रुपयांच्या वाढीनंतर जीएसटीसह याची किंमत १,०६,१२१ रुपये प्रति १० ग्रॅम झाली.
बुधवारी बाजार बंद होताना जीएसटीशिवाय चांदी ३,५८,२६७ रुपयांवर आणि सोनं १,६४,६३५ रुपयांवर बंद झालं होतं. सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) कडून दिवसातून दोनदा जाहीर केले जातात.
Web Summary : Gold and silver prices soared in the bullion market, reaching all-time highs. Gold jumped by ₹11,486, and silver surged by ₹27,666. The prices are ₹1,81,404 and ₹3,97,510 per 10 grams and per kg, respectively, including GST.
Web Summary : सराफा बाजार में सोना और चांदी की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंच गईं। सोने में ₹11,486 और चांदी में ₹27,666 की भारी वृद्धि हुई। जीएसटी सहित कीमतें क्रमशः ₹1,81,404 प्रति 10 ग्राम और ₹3,97,510 प्रति किलोग्राम हैं।