Join us

Gold Rate Today:अर्थसंकल्पानंतर घसरगुंडी सुरुच! सोने पुन्हा ७०० रुपयांनी घसरले! चांदीचा भाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 08:21 IST

Gold Rate, Silver Price Today मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : सोने-चांदीवरील सीमा शुल्क कमी करण्याच्या घोषणेनंतर मंगळवारी मोठी घसरण झाली, पाठोपाठ बुधवारीही सोन्याचे भाव पुन्हा ७०० रुपयांनी कमी झाले. त्यामुळे सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले आहे. चांदीच्या भावात मात्र ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.

मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्पात सोने- चांदीवरील सीमाशुल्क करण्याची घोषणा झाली आणि त्याच दिवशी लगेच सोन्याचे भाव दोन हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ७० हजार ७०० रुपये प्रति तोळ्यावर आले होते. दुसऱ्या दिवशी बुधवारी सकाळी पुन्हा २०० रुपयांची घसरण होऊन ते ७० हजार ५०० रुपयांवर आले. त्यानंतर दुपारी लगेच ५०० रुपयांची घसरण झाल्याने सोने ७० हजार रुपये प्रति तोळ्यावर आले.

चांदीही स्वस्तमंगळवारी चांदीचेही भाव तीन हजार ८०० रुपयांनी कमी होऊन ती ८५ हजार ५०० रुपये प्रति किलोवर आली होती. बुधवारी मात्र चांदीत ५०० रुपयांची वाढ होऊन ती ८६ हजार रुपये प्रति किलोवर पोहोचली.

टॅग्स :सोनंअर्थसंकल्प 2024