Join us
Daily Top 2Weekly Top 5

Gold Rate Today: सोन्याच्या दरात मोठी घसरण; उच्चांकी स्तराहून ₹२५,००० पर्यंत झालं स्वस्त, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2026 14:20 IST

Gold Price Today 17 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर.

Gold Price Today 17 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या भावात मोठी घसरण पाहायला मिळाली. आज, २४ कॅरेट सोन्याचा भाव आज २,९०३ रुपयांनी स्वस्त होऊन १,५१,१९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. सोन्याचा हा दर सराफा बाजारातील त्याच्या १,७६,१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा आता २४,९२६ रुपये म्हणजेच सुमारे २५,००० रुपयांनी स्वस्त झाला आहे. 

जीएसटीसह सोन्याची किंमत आज १,५५,७३० रुपयांवर आली आहे. दुसरीकडे, प्लॅटिनमच्या दरात २,८४२ रुपयांची घसरण झाली असून तो ६१,७५० रुपयांवर पोहोचला आहे. सोमवारी २४ कॅरेट सोनं (९९९ शुद्धता) जीएसटीशिवाय १,५४,०९८ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. हे दर आयबीजेए (IBJA) द्वारे जारी करण्यात आले असून संस्था दिवसातून दोनदा दर जाहीर करते.

जगातील पहिले ट्रिलियनेअर बनणार इलॉन मस्क! आता किती अब्ज डॉलर्स झाली नेटवर्थ?

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे ताजे दर

कॅरेटनुसार सोन्याच्या किमतीचा विचार केल्यास, आज २२ कॅरेट सोन्याचा भाव २,६५९ रुपयांच्या घसरणीसह १,३८,४९५ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर १,४२,६४९ रुपये इतका होतो. त्याचप्रमाणे १८ कॅरेट सोन्याच्या दरातही २,१७८ रुपयांची कपात झाली आहे. आज १८ कॅरेट सोने ११,३३,९६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं असून जीएसटीसह याची किंमत १,१६,७९७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याचे दर

१४ कॅरेट सोन्याचा दर १,६९८ रुपयांनी कोसळून ८८,४४९ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह हे सोनं ९१,१०२ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं उपलब्ध होईल. तसेच २३ कॅरेट सोन्याच्या दरात आज २,८९१ रुपयांची वाढ झाली असून ते १,५०,५९० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं आहे. जीएसटीसह २३ कॅरेट सोन्याची किंमत आता १,५५,१०७ रुपये झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold Prices Plummet: Down ₹25,000 From Peak; Check New Rates

Web Summary : Gold prices crashed today, falling ₹2,903 for 24-carat gold to ₹1,51,195 per 10 grams. This is ₹24,926 cheaper than its all-time high. Including GST, gold costs ₹1,55,730. Platinum also saw a drop, reaching ₹61,750.
टॅग्स :सोनंगुंतवणूक