Join us
Daily Top 2Weekly Top 5

सराफा बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट Gold ची किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:06 IST

Gold Rate 12 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे. पाहा काय आहेत नवे दर.

Gold Rate 12 Feb 2026: आज सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत मोठी घट पाहायला मिळत आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर ११७५ रुपयांनी स्वस्त होऊन १५६१४७ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. आता सोनं आपल्या १७६१२१ रुपयांच्या ऐतिहासिक उच्चांकापेक्षा १९९७४ रुपयांनी स्वस्त झाले आहे. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १६०८३१ रुपयांवर आला आहे. 

दुसरीकडे, प्लॅटिनमच्या दरातही १९०६ रुपयांची घसरण झाली असून तो ६७३८१ रुपयांवर पोहोचला आहे. बुधवारी जीएसटीशिवाय सोनं १५७३२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झालं होतं. आयबीजेए (IBJA) द्वारे हे दर दिवसातून दोनदा जाहीर केले जातात.

अमेरिकेतून गुपचुप पैसे काढतोय चीन; कुठे करतोय गुंतवणूक, काय आहे ड्रॅगनचा प्लॅन?

१८ आणि २२ कॅरेट सोन्याचे दर

२२ कॅरेट सोन्याच्या दरात १०७६ रुपयांची मोठी घसरण झाली असून तो १४३०३१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आला आहे. जीएसटीसह हा दर १४७३२१ रुपयांवर पोहोचलाय. त्याचबरोबर १८ कॅरेट सोन्यातही ८८२ रुपयांची घट नोंदवण्यात आली असून आज त्याचा दर ११७११० रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. १८ कॅरेट सोन्याची जीएसटीसह किंमत आता १२०६२३ रुपये प्रति १० ग्रॅम इतकी झाली आहे.

१४ आणि २३ कॅरेट सोन्याची स्थिती

१४ कॅरेट सोन्याच्या किमतीत ६८७ रुपयांची घट होऊन तो ९१३४६ रुपयांवर उघडला असून जीएसटीसह हा दर ९४०८६ रुपये प्रति १० ग्रॅम इतका असेल. तसंच २३ कॅरेट सोन्याचा दर आज ११७० रुपयांनी कोसळून १५५५२२ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडला. जीएसटी समाविष्ट केल्यानंतर २३ कॅरेट सोन्याची किंमत आता १६०१८७ रुपये इतकी झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices plummet in Sarafa market; check rates before buying.

Web Summary : Gold prices sharply declined in the Sarafa market. 24-carat gold fell by ₹1175 to ₹156147 per 10 grams. Other karat values also saw significant drops. Platinum decreased by ₹1906, reaching ₹67381.
टॅग्स :सोनंचांदी