Join us

Gold rate: लग्नसराईपूर्वीच महागलं सोनं, खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 15:00 IST

सोन्याच्या दरासंबंधातील बातमी लिहिपर्यंत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५५,९२७ रुपयांवर पोहोचले आहेत.

सध्या सोन्या, चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. नव्या वर्षात सोन्याचे दराने पुन्हा रेकॉर्ड मोडले आहे. ऑगस्ट २०२० मध्ये सोन्याच्या दराने ५६,२०० रुपयांवर जावून रेकॉर्ड बनवले होते. काल मंगळवारी बंद झालेल्या बाजारातसोनं ५५,५८१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचले आहे. येणाऱ्या काही दिवसात सोनं ६२,००० रुपयांवर जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच आज बुधवारी पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सलग तिसऱ्यांदा सोने-चांदीच्या व्यवहारात तेजी पाहायला मिळत आहे. सोन्याच्या वायदा भावात ३९७ रुपयांची वाढ झाली आहे. 

सोन्याच्या दरासंबंधातील बातमी लिहिपर्यंत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५५,९२७ रुपयांवर पोहोचले आहेत. एमसीएक्सवर ३ मार्च २०२३ च्या निश्चित होणाऱ्या वायदा बाजारात चांदीच्या दरातही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरात ३८० रुपयांची वाढ झाली असून प्रति किलोग्रॅम ७०,३३८ रुपयांवर पोहचला आहे. दरम्यान, ३ जानेवारी रोजी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याची किंमत ५५,५३० रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६९,९१७ रुपये प्रतिकिलो चांदी होती.  

दरम्यान, सोन्याच्या दरात मोठी वाढ होऊन ते ६० हजार रुपयांवर पोहोचणार आहेत. तर, चांदीचे दर ८०,००० रुपये प्रति किलोवर जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.  

टॅग्स :सोनंबाजारचांदी