Join us

Gold Silver Price Today: सोन्याचे दर काही कमी होईना, मात्र चांदीची किंमत घसरली; १० ग्रॅम Gold ची किती आहे किंमत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 14:35 IST

Gold Silver Price Today 24 Feb: लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सराफा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे.

Gold Silver Price Today 24 Feb: लग्नसराईचा हंगाम सुरू असताना सोन्याचे दर कमी होण्याचे नाव घेत नाहीत. सराफा बाजारात आज चांदीच्या दरात घसरण झाली आहे. सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी २४ कॅरेट सोन्याचा भाव २६४ रुपयांनी वधारून ८६,३५६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर चांदीच्या दरात प्रति किलो ९०३ रुपयांची घसरण झाली आहे. आज तो ९६,२४४ रुपये प्रति किलो दरानं उघडला.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) हा दर जाहीर केला आहे. यामध्ये जीएसटीचा समावेश नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक पडू शकतो.

१४ ते २३ कॅरेट सोन्याचे दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार आज २३ कॅरेट सोन्याचा भाव २६३ रुपयांनी वाढून ८६,०१० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव ही २४२ रुपयांनी वाढून ७९,१०२ रुपये झालाय. तर १० कॅरेटचा भाव १९८ रुपयांनी वाढून ६६,६९६ रुपये झाला. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव आता १५४ रुपयांनी वाढून ५०,५१८ रुपये प्रति १० ग्रॅम झालाय.

फेब्रुवारीत किती झालं सोनं

फेब्रुवारीबद्दल बोलायचं झालं तर आतापर्यंत सोन्यानं ४२७० रुपयांची उसळी घेतली आहे. कारण, ३१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा दर ८२,१६५ रुपये प्रति १० ग्रॅम होता. या वर्षी आतापर्यंत सोनं १०,६१६ रुपयांनी तर चांदी १०,२२७ रुपयांनी महागली. ३१ डिसेंबर २०२० रोजी सोनं ७५,७४० रुपयांवर बंद झालं होतं. चांदीही ८६,०१७ रुपये प्रति किलो ग्रॅमवर बंद झाली.

टॅग्स :सोनंचांदी