Gold Silver Price 25th Sept: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या भावात बदल झाला आहे. सणासुदीच्या काळात, आज २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ३५२ रुपयांनी कमी झाला आहे. दुसरीकडे, बुधवारी बंद झालेल्या भावाच्या तुलनेत चांदीच्या किमतीत प्रति किलो ४६७ रुपयांची वाढ झाली आहे. बुलियन मार्केटमध्ये आज सोन्याचा भाव जीएसटी वगळता १,१३,२३२ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा भाव जीएसटी वगळता १,३४,५५६ रुपये होता. आता जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याचा भाव १,१६,६२८ रुपये प्रति १० ग्रॅम आणि चांदीचा भाव १,३८,५९२ रुपये प्रति किलो झाला आहे.
सप्टेंबरमध्ये मोठी वाढ
इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, बुधवारी जीएसटी वगळता सोन्याचा भाव ११३,५८४ रुपयांवर बंद झाला होता, तर चांदीचा भाव १३४,०८९ रुपये प्रति किलो होता. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. या सप्टेंबर महिन्यात सोन्याच्या भावात प्रति १० ग्रॅम १०,८४४ रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदी प्रति किलो १६,९८४ रुपयांनी महाग झाली आहे. IBJA च्या दरानुसार, ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या दिवशी सोन्याचा भाव १०२,३८८ रुपये प्रति १० ग्रॅम होता, तर चांदीचा भाव ११७,५७२ रुपये प्रति किलो होता.
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलंकॅरेटनुसार सोन्याचे आजचे भाव
२३ कॅरेट सोनं: आज ३५० रुपयांनी कमी होऊन ११२,७७९ रुपये प्रति १० ग्रॅमनं उघडले, तर जीएसटीसह याची किंमत ११६,१६२ रुपये झाली आहे. यामध्ये मेकिंग चार्ज जोडण्यात आलेला नाही.
२२ कॅरेट सोनं: याची किंमत ३२२ रुपयांनी कमी होऊन १०३,७२१ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली आहे. जीएसटीसह हा भाव १०६,८३२ रुपये आहे.
१८ कॅरेट सोनं: आज २६४ रुपयांनी कमी होऊन ८४,९२४ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह हे ८७,४७१ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं.
१४ कॅरेट सोनं: हे २०६ रुपयांनी महाग होऊन ६६,२४१ रुपयांवर उघडलं. आता जीएसटीसह ते ६८,२२८ रुपयांवर पोहोचलं आहे.
Web Summary : Gold prices dipped in the bullion market, decreasing by ₹352 per 10 grams. Silver prices, however, increased by ₹467 per kg. This month, gold increased by ₹10,844 per 10 grams and silver by ₹16,984 per kg.
Web Summary : सराफा बाजार में सोने की कीमतों में गिरावट आई, 10 ग्राम पर ₹352 की कमी। चांदी की कीमतों में ₹467 प्रति किलो की वृद्धि हुई। इस महीने सोने में ₹10,844 प्रति 10 ग्राम और चांदी में ₹16,984 प्रति किलो की वृद्धि हुई।