Join us

सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात जोरदार तेजी, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार? चांदीचे दर काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 13:51 IST

Gold Silver Price Today: सणासुदीचा काळ जवळ येत असताना, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी, सोन्याची किमती सलग आठव्या दिवशी वाढली आणि त्यांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला.

Gold Silver Price Today: सणासुदीचा काळ जवळ येत असताना, सोन्याच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. बुधवार, ३ सप्टेंबर रोजी, सोन्याची किमती सलग आठव्या दिवशी वाढली आणि त्यांनी आतापर्यंतचा उच्चांक गाठला. २४ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ₹१.०६ लाख, २२ कॅरेट ₹९८,०५० आणि १८ कॅरेट ₹८०,२३० वर पोहोचलं. आज, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन लिमिटेडवर २४ कॅरेट सोने प्रति ग्रॅम १०५६३८ रुपयांवर पोहोचलं. त्याच वेळी, आज एक किलो चांदीची किंमत १,२२,९७० रुपयांवर पोहोचली. जागतिक स्तरावरही सोन्यानं सर्वोच्च पातळी गाठली.

सोन्याच्या किमती वाढण्याची कारणं

सोन्याच्या किमती वाढण्यामागील सर्वात मोठं कारण म्हणजे फेडरल रिझर्व्हची संभाव्य व्याजदर कपात, भू-राजकीय जोखीम आणि इक्विटी आणि बाँड मार्केटमधील अस्थिरता. यामुळेच गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूकीकडे वळत आहेत. ट्रम्प प्रशासनानं बेकायदेशीर टॅरिफ प्रकरण सर्वोच्च न्यायालयात नेण्याबद्दल वक्तव्य केलं तेव्हा बाजारावर अतिरिक्त दबाव आला, तर यूएस फेडच्या आगामी धोरण बैठकीत २५ बेसिस पॉइंट कपातीची शक्यता व्यक्त करण्यात आली. मेहता इक्विटीजचे व्हीपी कमोडिटीज राहुल कलंत्री यांच्या म्हणण्यानुसार डॉलर निर्देशांकातील रिकव्हरीदरम्यान बुलियन मार्केटमध्ये जलद चढ-उतार दिसून येत आहेत. ते पुढे म्हणाले, 'अमेरिकन ट्रेड टॅरिफ अनिश्चितता आणि जागतिक इक्विटी मार्केटमधील कमकुवतपणामुळे गुंतवणूकदार सुरक्षित मालमत्तेकडे वळत आहेत. यामुळे सोन्याचे भाव वाढले आहेत.'

Nifty थेट शून्यावर, झिरोदामध्ये तांत्रिक बिघाड; नितीन कामथ झाले ट्रोल

जागतिक बाजारपेठेतील परिस्थिती

जागतिक पातळीवर, स्पॉट गोल्ड ३,५३७.७६ डॉलर्स प्रति औंसवर व्यवहार करत होता, तर कामकाजादरम्या तो ३,५४६.९९ डॉलर्स प्रति औंसवर पोहोचला. अमेरिकन गोल्ड फ्युचर्स (डिसेंबर डिलिव्हरी) ०.३% नं वाढून ३,६०३.५० डॉलर्स प्रति औंसवर बंद झाला.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक