Gold Silver Price 19 September: आजही सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली आहे. तर, दुसरीकडे चांदीच्या किमतीत वाढ झाली आहे. आज २४ कॅरेट सोनं २९४ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १०९८७३ रुपयांवर आलं. त्याच वेळी, चांदीचा दर एका झटक्यात प्रति किलो १४०० रुपयांनी वाढला आणि जीएसटीशिवाय १२८५०० रुपयांवर उघडला. जीएसटीसह २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ११३१६९ रुपये झालीये आणि जीएसटीसह चांदीचा दर १३२३५५ रुपये प्रति किलो झालाय.
आयबीजेएच्या मते, गुरुवारी जीएसटीशिवाय सोन्याचा दर प्रति किलो ₹१,१०,१६७ वर बंद झाला. दुसरीकडे, चांदीचा दर जीएसटीशिवाय प्रति किलो ₹१,२७,१०० वर बंद झाला. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जाहीर करते: एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसरे संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.
IPO असावा तर असा! ७४% प्रीमिअमवर बंपर लिस्टिंग; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल
आज कॅरेटनुसार सोन्याचे दर
- २३ कॅरेट सोनं देखील २९३ रुपयांनी घसरून १,०९,४३३ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं. जीएसटीसह त्याची किंमत आता १,१२,७१५ रुपये आहे. यामध्ये मेकिंग चार्जेसचा समावेश करण्यात आलेला नाही.
- २२ कॅरेट सोन्याची किंमत २६९ रुपयांनी घसरून १,००,६४४ रुपये प्रति १० ग्रॅमवर आली. जीएसटीसह ती १,०३,६६३ रुपये आहे.
- १८ कॅरेट सोन्याची किंमत २२० रुपयांनी घसरून ८२,४०५ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडली आणि जीएसटीसह ती ८४,८७७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचली.
- १४ कॅरेट सोनं १७२ रुपयांनी घसरून ६४,२७६ रुपये प्रति १० ग्रॅमवर उघडलं आणि आता जीएसटीसह ते ६६,२०४ रुपयांवर पोहोचलंय.