Join us

ऑल टाईम हायवर सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 14:34 IST

Gold Silver Price 17 June: आज, सराफा बाजारात सोन्याचा भाव ९९३७३ रुपयांच्या त्याच्या आजवरच्या उच्चांकी पातळीवरू घसरला. तथापि, चांदीचे दर अद्यापही लाखांच्या वरच आहेत.

Gold Silver Price 17 June: आज, सराफा बाजारात सोन्याचा भाव ९९३७३ रुपयांच्या त्याच्या आजवरच्या उच्चांकी पातळीवरू घसरला. तथापि, चांदीचे दर अद्यापही लाखांच्या वरच आहेत. असं असूनही, सोन्याचांदीचे दर जीएसटीसह एक लाखाच्या पुढे गेलेत. जीएसटीसह २४ कॅरेट सोनं १०१७७४ रुपये प्रति १० ग्रॅम दरानं विकले जात आहे, तर चांदी ११०१६० रुपये प्रति किलोनं विकली जात आहे.

जीएसटीशिवाय किंमतींबद्दल बोलायचं झालं तर, आज सोनं प्रति १० ग्रॅम ९८८१० रुपयांवर उघडलं, जे सोमवारच्या बंद किमतीच्या तुलनेत ५६३ रुपयांनी स्वस्त झालं. त्याच वेळी, चांदी २५२ रुपयांनी वाढून १०६९५२ रुपयांवर पोहोचली. जीएसटीशिवाय त्याचा आजवरचा उच्चांकी स्तर १०७००० रुपये आहे.

परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोन्या-चांदीचे  स्पॉट रेट जाहीर केले आहेत. यावर GST लागू नाही. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

काय आहेत नवे दर?

आयबीजेएच्या दरांनुसार, २३ कॅरेट सोनंदेखील ५६१ रुपयांनी स्वस्त झालं आणि ते ९८४१४ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडलं. त्याच वेळी, २२ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत दुपारी ५१६ रुपयांनी घसरली आणि ९०५१० रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडली. १८ कॅरेट सोन्याची किंमतही ४२२ रुपयांनी स्वस्त झाली आहे आणि ती प्रति १० ग्रॅम ७४१०८ रुपयांवर आली. तर १४ कॅरेट सोन्याची किंमत ३२९ रुपयांनी कमी होऊन ५७८०४ रुपयांवर आली आहे. यामध्ये जीएसटी आणि मेकिंग चार्ज समाविष्ट नाही.

टॅग्स :सोनंचांदी