Join us

Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2024 13:13 IST

Gold Price Today: आज 2 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये गुरुवारी 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली.

Gold Price Today: आज 2 मे 2024 रोजी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये गुरुवारी 24 आणि 22 कॅरेट सोन्याच्या दरात 1000 रुपयांपर्यंत घसरण झाली. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. सोन्याचा भाव 75,000 रुपयांच्या पातळीच्या खाली आला आहे. परंतु आता सोन्याचे दर आणखी किती कमी होणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. 

का होतेय सोन्याच्या दरात घसरण? 

अलीकडे मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची चिन्हं आणि देशांतर्गत काही कारणांमुळे सोन्याच्या दरात घसरण होताना दिसत आहे. दिल्लीत सोन्याचा दर 72,740 रुपये आहे. तर चांदीचा भाव 82,900 रुपये प्रति किलोग्रॅम वर बंद झाला. कालच्या तुलनेत आज चांदीच्या दरात 500 रुपयांची घसरण झाली. सोन्याबरोबरच चांदीमध्येही करेक्शन पाहायला मिळत आहे. 

2 मे 2024 रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 71,650 रुपये आहे. दिल्लीत सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 75,000 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचल्यापासून घसरताना दिसत आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोनं 75,000 रुपयांच्या विक्रमी पातळीवरून 71,500 रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. 

मुंबईत आज सोन्याचा दर 

मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,540 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 

अहमदाबादमध्ये आज सोन्याचा दर 

अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 65,590 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 71,550 रुपये इतका आहे.

टॅग्स :सोनंचांदी