Join us

Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक! आज स्वस्त झालं Gold, पाहा नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2024 12:15 IST

Gold Price Today: आज म्हणजेच गुरुवारी सोन्याच्या तेजीला ब्रेक लागला. पाहा काय सोन्या-चांदीचे नवे दर.

Gold Price Today: आज म्हणजेच गुरुवारी सोन्याच्या तेजीला ब्रेक लागला. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 38,460 रुपयांवर पोहोचला आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,300 रुपयांच्या आसपास आहे. "आता सोने रेंजमध्ये ट्रेड करत आहे आणि त्यानंतर पुन्हा 75,000 रुपयांच्या पीक वर येऊ शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केलाय. तर चांदीचा भाव 84,900 रुपये प्रति किलोग्रॅम इतका झाला. 

दिल्लीत आज सोन्याचा दर9 मे 2024 रोजी दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,510 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. दरम्यान, 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,390 रुपये प्रति 10 ग्रॅम झालाय. 

मुंबईत आज सोन्याचा दरमुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,240 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 72,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 66,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 72,340 रुपये झाला आहे. दरम्यान, यामध्ये कोणत्याही प्रकारचं मेकिंग शुल्क किंवा जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे याच्या किंमतीत बदल होऊ शकतात.

टॅग्स :सोनं