Join us
Daily Top 2Weekly Top 5

₹३००० नं स्वस्त झालं सोनं, चांदी ₹८००० नं आपटली; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट रेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 15:22 IST

Gold Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्याच्या किमतीत झालेली घसरण खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर स्वस्त झाले आहेत.

Gold Price Today: लग्नसराईच्या या हंगामात सोन्याच्या किमतीत झालेली घसरण खरेदीदारांसाठी चांगली बातमी आहे. कालच्या तुलनेत आज सोन्याचे दर स्वस्त झाले आहेत. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज, शुक्रवारी, ₹ १,२२,१४९ प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. काल सकाळी हा दर ₹ १,२२,८८१ प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच, कालच्या तुलनेत सोन्याचा भाव ₹ ७३२ ने कमी झाला आहे.

चांदी ४,४६५ रुपयांनी घसरली

चांदीबद्दल बोलायचं झाल्यास, आज चांदी ₹ १,५१,२७५ प्रति किलोग्राम दराने विकली जात आहे. काल चांदीचा दर ₹ १,५५,८४० प्रति किलोग्राम होता. कालच्या तुलनेत चांदीचा भाव ₹ ४,४६५ प्रति किलोग्रामनं कमी झाला आहे.

क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! २४ तासांत १७ लाख कोटींची फोडणी, क्रिप्टो मार्केट आपटलं; Bitcoin ७% पेक्षा अधिक घसरलं

कॅरेटनुसार आजचे दर

आयबीजेएनुसार, आज २३ कॅरेट सोन्याचा दर ₹ १,२१,६६० प्रति १० ग्रॅम होता. २२ कॅरेटचा भाव ₹ १,११,८८८ आणि १८ कॅरेटचा भाव ₹ ९१,६१२ प्रति १० ग्रॅमवर आला आहे. तर, १४ कॅरेट सोन्याचा दर ₹ ७१,४५७ प्रति किलोग्राम झाला आहे.

सोनं ३,००९ रुपये स्वस्त

मागील आठवड्यात शुक्रवारी इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनच्या (IBJA) अहवालानुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर ₹ १,२५,४२८ प्रति १० ग्रॅम होता. तर, २३ कॅरेट सोन्याचा भाव ₹ १,२४,७९४ प्रति १० ग्रॅम होता. गेल्या आठवड्याच्या तुलनेत आतापर्यंत २४ कॅरेट सोन्याचा भाव ₹ ३,००९ नं स्वस्त झाला आहे.

चांदीही ८,००० रुपयांनी स्वस्त

चांदीच्या किमतीतही मोठी घसरण नोंदवली गेली आहे. १४ नोव्हेंबरला चांदीचा दर ₹ १,५९,३६७ प्रति किलोग्राम होता. तेव्हापासून आजपर्यंत चांदीच्या किमतीत ₹ ७,९९२ ची घसरण झाली आहे. सध्या लग्नाचा हंगाम सुरू आहे. अशा परिस्थितीत सोन्याच्या किमतीत झालेली घसरण खरेदीदारांसाठी मोठा दिलासा आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वैलर्स असोसिएशनकडून दररोज दोनदा दर जाहीर केले जातात, एकदा दुपारी १२ वाजता आणि संध्याकाळी ५ वाजता हे दर जारी केले जातात. या दरांच्या तुलनेत तुमच्या शहरातील किमतीत ₹ १,००० ते ₹ २,००० चा फरक असू शकतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold prices fall, silver crashes; check latest rates now!

Web Summary : Good news for buyers! Gold prices have decreased, with 24-carat gold at ₹1,22,149 per 10 grams. Silver prices also fell to ₹1,51,275 per kilogram. Gold is ₹3,009 cheaper than last week, and silver is ₹7,992 cheaper since November 14th, offering relief during the wedding season.
टॅग्स :सोनंचांदी