Gold and Silver Price : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमती आपलेच विक्रम मोडत चालले आहेत. अशीच परिस्थिती राहिली तर दिवाळीपर्यंत सोने दीड लाखांपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील क्रेडिट क्वालिटीबद्दल वाढलेल्या चिंता आणि अमेरिका-चीनमधील वाढता तणाव यामुळे गुंतवणूकदार पुन्हा एकदा सुरक्षित गुंतवणूक असलेल्या सोने आणि चांदीकडे वळले आहेत. परिणामी, शुक्रवारी (१७ ऑक्टोबर) सोने आणि चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंनी विक्रमी उच्चांक गाठला.
चांदीचा ४० वर्षांचा रेकॉर्ड ब्रेक
- चांदीच्या किमतीने या आठवड्यात १९८० मध्ये केलेला आपला 'ऑल टाईम रेकॉर्ड' मोडला. शुक्रवारी चांदीचा दर ५४.३७७५ डॉलर प्रति औंस या नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचला. आठवड्याभरात चांदीने ८% ची वाढ नोंदवली.
- २०२० पासून चांदीच्या किंमतीत आतापर्यंत तब्बल ९०% हून अधिक वाढ झाली आहे. सोन्याप्रमाणेच जागतिक आर्थिक घटक, तसेच लंडन बाजारातील पुरवठ्याची कमतरता यामुळे चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
- न्यूयॉर्कच्या कॉमेक्स फ्युचर्स एक्सचेंजमधून गेल्या आठवड्यात १.५ कोटी औंसहून अधिक चांदी लंडनमध्ये पाठवली गेली आहे, ज्यामुळे जागतिक स्तरावर चांदीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे.
सोनेही 'विक्रमी' वेगानेशुक्रवारी सोन्याचा दर १.२% ने वाढून ४,३७९.९३ डॉलर प्रति औंसवर पोहोचला. २००८ नंतरची ही सोन्याची सर्वात मोठी साप्ताहिक वाढ ठरण्याची शक्यता आहे.२०२५ मध्ये आतापर्यंत सोन्याच्या किंमतीत ६५% हून अधिक वाढ झाली आहे. मध्यवर्ती बँकांची खरेदी, एक्सचेंज ट्रेडेड फंड्स मधील मोठी गुंतवणूक आणि भू-राजकीय तणावामुळे सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी, हे या तेजीचे प्रमुख कारण आहे.
तेजीची कारणे आणि जागतिक स्थितीया मौल्यवान धातूंच्या किमतीतील वाढीमागे अनेक जागतिक आणि आर्थिक कारणे आहेत.१. क्रेडिट गुणवत्ता: अमेरिकेतील दोन प्रादेशिक बँकांनी कर्ज फसवणुकीच्या समस्या उघड केल्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये कर्जदारांच्या क्रेडिट स्थितीबद्दल चिंता वाढली आहे. यामुळे सुरक्षित मालमत्तेची मागणी वाढली.२. अमेरिका-चीन तणाव: अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्ध पुन्हा भडकले आहे. चीनच्या वाणिज्य मंत्र्यांनी वाढत्या तणावासाठी अमेरिकेला जबाबदार धरले आहे. या भू-राजकीय तणावामुळे सोन्या-चांदीला मागणी वाढली.३. फेडरल रिझर्व्हचे संकेत: अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी या महिन्यात पुन्हा ०.२५% व्याजदर कपात करण्याचे संकेत दिले आहेत. व्याज न देणाऱ्या सोन्या-चांदीसाठी हे अत्यंत सकारात्मक चिन्ह मानले जाते.
वाचा - मोठा नफा कमावूनही कंपनीचा धक्कादायक निर्णय! तब्बल १६,००० कर्मचाऱ्यांना देणार नारळ
या सर्व घटकांमुळे सोने आणि चांदी हे केवळ सुरक्षित गुंतवणूक म्हणून नव्हे, तर महागाई आणि अस्थिरतेविरुद्धचे सर्वात मोठे कवच म्हणून समोर आले आहेत. प्लॅटिनम आणि पॅलेडियममध्येही या आठवड्यात अनुक्रमे ८% आणि १६% ची मोठी वाढ झाली आहे.
Web Summary : Gold and silver prices surge to record highs amid economic uncertainty and geopolitical tensions. Silver has jumped 90% this year, breaking a 40-year record, while gold is up 65%. Increased demand driven by credit concerns and US-China tensions fuels the rally.
Web Summary : आर्थिक अनिश्चितता और भू-राजनीतिक तनाव के बीच सोना और चांदी की कीमतें रिकॉर्ड ऊंचाई पर पहुंच गईं। चांदी में इस साल 90% की वृद्धि हुई, जो 40 साल का रिकॉर्ड तोड़ रही है, जबकि सोना 65% ऊपर है। क्रेडिट चिंताओं और अमेरिका-चीन तनाव से बढ़ी मांग ने तेजी को बढ़ावा दिया।