Join us

डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे सोन्याला झळाळी? सातत्याने वाढतीये किंमत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 16:39 IST

Gold Rate Today: गेल्या काही दिवसांपासून सोन्याची किंमत सर्वोच्च पातळीवर पोहचली आहे.

Gold Price: गेल्या काही दिवसांपासून जागतिक बाजारपेठेत सोन्याला 'अच्छे दिन' आले आहेत. अमेरिकेत डॉनाल्ड ट्रम्प यांची सत्ता आल्यामुळे सोन्याच्या किमती गगनाला भिडल्याचे तज्ञांचे मत आहे. याचे कारण म्हणजे, ट्रम्प यांनी जागतिक व्यापार युद्ध छेडल्याने गुंतवणूकदारांनी सोन्यात रस घेणे सुरू केले आहे. त्यामुळे केवळ भारतातच नव्हे, तर जगभरातील गुंतवणूकदार सोने खरेदी करत आहेत.

सोनं सुरक्षित गुंतवणूक जेव्हा बाजार अस्थिर असतो, तेव्हा सोनं ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. या कारणास्तव, जेव्हा जागतिक बाजारपेठ अस्तिर होते, राजकीय किंवा आर्थिक अनिश्चितता येते, तेव्हा गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरवात करतात. भारतात सोन्याचे गुंतवणूकीसह सांस्कृतिक महत्त्वही खूप जास्त आहे. त्यामुळेच अशा काळात भारतातदेखील सोन्यात गुंतवणूक वाढते.

मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव 86 हजार रुपयांच्या पुढे 10 फेब्रुवारीला दिल्लीत 10 ग्रॅम सोन्याची किंमत 87,210 रुपये होती. तर, मुंबईत तो 86 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. याशिवाय, चेन्नईमध्ये 87,060, कोलकात्यात 87,060 रुपयांना उपलब्ध आहे. 

टॅग्स :डोनाल्ड ट्रम्पसोनंगुंतवणूक