Join us
Daily Top 2Weekly Top 5

सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 15:32 IST

Gold Price Today IBJA: सोन्याच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) तर्फे मंगळवारी नवीन दर जाहीर करण्यात आलेत.

Gold Price Today IBJA: सोन्याच्या किमतीत आज घसरण पाहायला मिळाली आहे. 'इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशन' (IBJA) तर्फे मंगळवारी नवीन दर जाहीर करण्यात आलेत. IBJA नुसार, २४ कॅरेट सोन्याचा दर सध्या १,४७,४८९ रुपये प्रति १० ग्रॅम आहे. सोमवारी संध्याकाळी २४ कॅरेट सोन्याचा दर १,४८,८९९ रुपये प्रति १० ग्रॅम होता. म्हणजेच कालच्या तुलनेत आज सोन्याच्या किमतीत प्रति १० ग्रॅम १४१० रुपयांची घसरण नोंदवण्यात आली आहे. सोन्याप्रमाणेच चांदीही स्वस्त झाली आहे.

२३ कॅरेट ते १४ कॅरेट सोन्याचे आजचे दर

इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेल्या किमतींनुसार विविध कॅरेटच्या सोन्याचे दर खालीलप्रमाणे आहेत:२३ कॅरेट: १,४६,८९८ रुपये प्रति १० ग्रॅम.२२ कॅरेट: १,३५,१०० रुपये प्रति १० ग्रॅम.१८ कॅरेट: १,१०,६१७ रुपये प्रति १० ग्रॅम.१४ कॅरेट: ८६,२८१ रुपये प्रति १० ग्रॅम.

नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?

चांदीचा आजचा दर (Silver Price Today)IBJA च्या आकडेवारीनुसार, आज १ किलोग्राम चांदीचा दर २,३१,४३५ रुपये आहे. यापूर्वी सोमवारी संध्याकाळी चांदीचा दर २,३४,०४३ रुपये प्रति १० ग्रॅमच्या पातळीवर होता. कालच्या तुलनेत आज चांदीच्या किमतीत २६०८ रुपयांची मोठी घसरण पाहायला मिळाली आहे.

१ एप्रिलच्या तुलनेत किमती किती कमी झाल्या आहेत?

या महिन्याच्या सुरुवातीला विशेषतः १ एप्रिल रोजी सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५०,८५३ इतका होता. तेव्हापासून, सोन्याच्या किमतींमध्ये ₹३,३६४ ची घट दिसून आली आहे. याच कालावधीत, चांदीच्या किमतींमध्ये प्रति किलो ₹८,४०१ ची घसरण झाली आहे. विशेष म्हणजे, १ एप्रिल रोजी चांदीचा भाव प्रति किलो ₹२,३९,८३६ या पातळीवर होता.सोन्याच्या किमतीत होत असलेल्या या घसरणीमागे मुख्य कारण सुरू असलेले युद्ध आहे. युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल ११० डॉलरच्या पार गेला आहे. तसेच, युद्धजन्य परिस्थितीमुळे अमेरिकन डॉलर सतत मजबूत होत आहे, ज्याचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या किमतीवर झालाय. सध्या गुंतवणूकदार सोन्याऐवजी डॉलरमध्ये गुंतवणूक करण्यास अधिक पसंती देत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold, Silver Prices Drop Sharply; Check Latest Rates Now!

Web Summary : Gold prices fell ₹3364, silver ₹8401. 24 Carat gold is ₹1,47,489 per 10 grams. Silver is ₹2,31,435 per kg. War and strong dollar impact prices.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक