Join us

सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 11:34 IST

Gold Rate Fall: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या ट्रुथ सोशल अकाउंटवर सोन्याबाबत मोठी घोषणा केली. त्यानंतर सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली.

Gold Rate Fall : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात विक्रमी वाढ झाली होती. पण, आता या वाढीला ब्रेक लागला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठी घोषणा केली, ज्यामुळे सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. ट्रम्प यांनी सांगितले की, सोन्यावर कोणताही टॅरिफ (आयात शुल्क) लादला जाणार नाही. या घोषणेमुळे मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर सोन्याचा भाव एकाच दिवसात १४०० रुपयांहून अधिक कमी झाला आहे.

MCX वर सोन्याचा भाव किती खाली आला?

  • सोमवारी, MCX वर सोन्याच्या दरात मोठी घसरण दिसून आली.
  • ९९९ शुद्धतेच्या १० ग्रॅम सोन्याचा भाव १,४०९ रुपयांनी कमी झाला.
  • हा दर १.३८% ने घसरून १,००,३८९ रुपयांवर बंद झाला.
  • काही दिवसांपूर्वी सोन्याने १,०२,२५० रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला होता. आता त्या तुलनेत सोने १,८६१ रुपयाने स्वस्त झाले आहे.

ट्रम्प नेमकं काय म्हणाले?डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट लिहून सोन्यावर कर न लावण्याचे स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव २.४८% नी घसरून प्रति औंस३,४०४.७० डॉलरवर बंद झाला.

देशांतर्गत बाजारावर काय परिणाम झाला?

  • इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, देशांतर्गत बाजारातही सोन्याच्या दरात घट झाली आहे.
  • सोमवारी २४ कॅरेट सोन्याचा दर १,००,२०१ रुपये होता.
  • बाजार बंद होईपर्यंत तो ९९,९५७ रुपयांवर आला, म्हणजेच एका दिवसात २४४ रुपयांनी कमी झाला.
  • २२ कॅरेट सोन्याचा दर ९७,५६० रुपये आणि २० कॅरेट सोन्याचा दर ८८,९६० रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे.

वाचा - SBI-महिंद्रासह 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइस, तुमच्याकडे आहेत का?

हे दर दररोज सकाळी आणि संध्याकाळी IBJA च्या वेबसाइटवर अपडेट होतात. दागिने खरेदी करताना सोन्यावर ३% जीएसटी आणि मेकिंग चार्जेस लागतात, ज्यामुळे अंतिम किंमत वाढते.

टॅग्स :सोनंटॅरिफ युद्धडोनाल्ड ट्रम्पगुंतवणूकअमेरिका