Gold Silver Price Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी तेजी दिसून येत आहे. अर्थसंकल्पानंतर आता सोमवारीही सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ दिसून आली. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ८४,६६३ रुपये झालाय. काल तो ८३,२०३ रुपये होता आणि गेल्या आठवड्यात २४ कॅरेट सोन्याचा दर ८२,५८३ रुपये प्रति १० ग्रॅम होता. दिल्लीत आज चांदीचा भाव १,०२,६०० रुपये प्रति किलो आहे, जो कालच्या १,०१,७०० रुपये प्रति किलोच्या दरापेक्षा अधिक आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (आयबीजेए) जारी केलेल्या आजच्या दराबद्दल बोलायचं झालं तर जीएसटीशिवाय २४ कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत ८२,०९४ रुपये आहे. शुक्रवारच्या बंद किमतीच्या तुलनेत त्यात ८ रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचा भाव आज १०५८ रुपयांनी घसरून ९२,४७५ रुपये प्रति किलो ग्रॅम झाला. शुक्रवारी तो ९३,५३३ रुपयांवर उघडला.
किती आहे दर?
लाइव्ह मिंटनुसार, चेन्नईत आज ३ फेब्रुवारी रोजी सोन्याचा भाव ८४,५११ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, जो काल ८३,०५१ रुपये होता आणि मागील आठवड्यात तो ८२,४३१ रुपये होता. चेन्नईत आज चांदीचा भाव १,०९,७०० रुपये प्रति किलो आहे, जो कालच्या १,०८,८०० रुपये आणि मागील आठवड्याच्या १,०७,६०० रुपये प्रति किलोपेक्षा महाग आहे.
मुंबईत सोन्याचा भाव ८४,५१७ रुपये प्रति १० ग्रॅम आहे, तर काल तो ८३,०५७ रुपये आणि मागील आठवड्यात ८२,४३७ रुपये होता. मुंबईत चांदीचा भाव १,०१,९०० रुपये प्रति किलो आहे, जो कालच्या १,०१,००० रुपये आणि मागील आठवड्याच्या ९९,८०० रुपयांच्या किंमतीपेक्षा जास्त आहे. कोलकात्यात सोन्याचा भाव ८४,५१५ रुपये आणि चांदीचा भाव १,०३,४०० रुपये आहे.
एमसीएक्सवर भाव काय?
आज एमसीएक्सवर जून २०२५ चा सोन्याचा वायदा भाव ८३,४५० रुपये प्रति १० ग्रॅम होता. तर मे २०२५ मधील चांदीचा वायदा भाव ९५,२०५ रुपये प्रति किलो होता.