Join us

Gold Price Today: सोन्याची किंमत 'ऑल टाईम हाय'वर, आता ६६ हजारांच्या जवळ पोहोचला भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 15:05 IST

सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. सर्व शहरांमध्ये सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकी स्तरावर उघडला.

Gold Silver Price 20 March 2024: सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. आज, बुधवार, 20 मार्च रोजी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66000 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या अगदी जवळ पोहोचला आहे. आज दिल्ली, मुंबई, गोरखपूर, लखनौ, जयपूर, इंदूर, कोलकाता, जयपूर आणि पाटणासह सर्व शहरांमध्ये सोन्याचा भाव सर्वकालीन उच्चांकी स्तरावर उघडला. 

आज 24 कॅरेट सोन्याची सरासरी स्पॉट किंमत 65795 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​उघडली. हा त्याचा आजवरचा नवा उच्चांकी स्तर आहे. मंगळवारच्या 65589 रुपयांच्या बंद किंमतीच्या तुलनेत सोनं 206 रुपये प्रति 10 ग्रॅमनं महागलं. तर चांदी 15 रुपयांनी वाढून 73859 रुपये किलो झाली आहे. 

का वाढतोय सोन्याचा भाव? 

सोन्याच्या या दरवाढीमागे 3 प्रमुख कारणं आहेत. जगाला आर्थिक मंदीची भीती वाटत आहे, हे सोन्याच्या दरवाढीचं प्रमुख कारण असल्याची प्रतिक्रिया केडिया कमोडिटीजचे प्रेसिडेंट अजय केडिया यांनी दिली. याशिवाय केंद्रीय बँकेची खरेदी आणि लग्नासराईच्या कालावधीमुळे सोन्याची मागणी वाढली असल्याचं त्यांनी नमूद केलं. 

किती आहे किंमत? 

आज सराफा बाजारात 23 कॅरेट सोन्याची सरासरी किंमत आता 206 रुपयांनी वाढून 65553 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे. तर, जीएसटी आणि ज्वेलरी मेकिंग चार्जेसशिवाय, 22 कॅरेट सोन्याचा भाव आता 188 रुपये प्रति 10 ग्रॅम वाढून 60268 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे. 18 कॅरेट सोन्याच्या दरात 10 ग्रॅममागे 120 रुपयांची वाढ झाली आहे. आता तो 49192 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर 14 कॅरेट सोन्याच्या दरातही 120 रुपयांची वाढ झाली आहे. आज ते 38490 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले. 

सोन्या-चांदीचे हे दर इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनद्वारे (IBJA) जारी करण्यात येतात. या दरावर जीएसटी आणि दागिने बनवण्याचं शुल्क लागू नाही. तुमच्या शहरात सोन्या-चांदीचे दर 1000 ते 2000 रुपयांनी महाग असण्याची शक्यता आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) ही 104 वर्षे जुनी संघटना आहे.

टॅग्स :सोनंव्यवसाय