Join us

₹१.४५ लाखांपर्यंत पोहोचू शकतो सोन्याचा भाव, काय आहे यातील तेजीचं कारण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 10:19 IST

Gold Silver Price: यावर्षी सोने आणि चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोन्याचा भाव ₹१.२३ लाख आणि चांदीच्या किंमती ₹१.५७ लाख च्या नव्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांचा अंदाज होता की या दिवाळीपर्यंत सोने सव्वा लाख रुपयांचा टप्पा गाठेल.

Gold Silver Price: यावर्षी सोने आणि चांदीच्या किंमतींनी सर्व रेकॉर्ड तोडले आहेत. सोन्याचा भाव ₹१.२३ लाख आणि चांदीच्या किंमती ₹१.५७ लाख च्या नव्या शिखरावर पोहोचल्या आहेत. तज्ज्ञांचा अंदाज होता की या दिवाळीपर्यंत सोने सव्वा लाख रुपयांचा टप्पा गाठेल आणि त्याच अंदाजानुसार सोनं त्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहोचलंय.

सोन्याचे पुढील लक्ष्य ₹१.४५ लाख

गोल्डमॅन सॅक्सच्या अहवालानुसार, सोन्यातील ही तेजी कायम राहिल्यास, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याचे दर लवकरच ४५०० डॉलर्स पर्यंत पोहोचू शकतात. भारतात ही किंमत सुमारे ₹१.४५ लाख असेल.

यावर्षी ५५ टक्क्यांहून अधिक वाढ

१ जानेवारी २०२५ रोजी सोन्याचा दर ₹७७,६०० प्रति १० ग्रॅम होता. यात आतापर्यंत ₹४५,७०० ची वाढ झाली आहे. याचा अर्थ, गुंतवणूकदारांना ५५ टक्क्यांहून अधिक नफा मिळाला आहे. या किंमतींमध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वात जलद वाढ नोंदवली गेली. सप्टेंबरपासून आतापर्यंत सोन्याचे दर ₹२५,३०० नं वाढले आहेत. तसेच, २०२५ च्या पहिल्या सहामाहीत या मौल्यवान धातूनं गुंतवणूकदारांना सुमारे २७ टक्के परतावा दिला होता. ३० जून रोजी दर ₹९७,५८३ पर्यंत पोहोचले होते.

PPF बनेल रिटर्न मशीन, १ रुपयाही खर्च केल्याशिवाय दरवर्षी कमवाल ₹२.८८ लाखांचं व्याज; पाहा कमाईचं सिक्रेट

सर्वात जलद वाढ

गेल्या २० वर्षांत सोन्याच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. २००५ मध्ये ₹७,००० असलेलं सोनं २०२५ मध्ये ₹१,२३,३०० प्रति १० ग्रॅम झालं आहे, जी वाढ सुमारे १६६१ टक्क्यांहून अधिक झालं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव ३९७० डॉलर्स प्रति औंसवर पोहोचलाय. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, यावेळच्या सोन्याच्या किंमतींतील तेजीमागे केवळ महागाई किंवा सामान्य लोकांची खरेदी नसून, मोठी जागतिक कारणं आहेत. सध्याच्या परिस्थितीनुसार सोन्यातील तेजीचा हा प्रवास आणखी लांबण्याची शक्यता आहे. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहक दोघांचीही आवड यात कायम आहे.

सोनं आणि सेन्सेक्सचा प्रवास

  • २००५ मध्ये सोनं ₹७,००० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स ८,००० वर होता.
  • २०१० मध्ये सोने ₹१८,५०० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स २०,५०९ वर होता.
  • २०१५ मध्ये सोने ₹२६,००० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स २६,११७ वर होता.
  • २०२० मध्ये सोने ₹४९,५०० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स ४७,७५१ वर होता.
  • २०२४ मध्ये सोने ₹७३,२५० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स ७४,८५० वर होता.
  • २०२५ मध्ये सोने ₹१,२३,३०० प्रति १० ग्रॅमवर होतं आणि सेन्सेक्स ८१,८४६ वर होता.​​​​​​

सोनं बनलं सर्वात सुरक्षित गुंतवणूक

गुंतवणूक बँक गोल्डमन सॅक्सच्या अहवालात म्हटलंय की, सध्याच्या जागतिक आर्थिक आणि राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणात सोनं सुरक्षित गुंतवणूक बनलं आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हवर व्याजदर कपातीचा दबाव आणि डॉलरवरील विश्वास कमी होणं यासारख्या परिस्थितींनी गुंतवणूकदारांना यूएस ट्रेजरीमधून रक्कम काढून सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास प्रेरित केलं आहे. जर एक टक्का रक्कम देखील यूएस ट्रेजरीमधून सोन्यात गेली, तर मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किमतीत पुढेही मोठी तेजी पाहायला मिळू शकते.

चांदीनेही झोळी भरली

सोन्याप्रमाणेच चांदीच्या किमतींमध्येही यावर्षी ७५.४७ टक्के वाढ झाली आहे. डिसेंबर २०२४ च्या अखेरीस चांदीचा भाव ₹८९,७०० प्रति किलोग्राम होता, जो आता वाढून ₹१,५७,४०० प्रति किलोच्या (सर्व करांसह) नव्या उच्चांकी स्तरावर पोहोचला आहे. मागील शुक्रवारी चांदीचे दर पहिल्यांदा ₹१.५० लाखांवर पोहोचले होते. आंतरराष्ट्रीय बाजारात एक टक्क्यांहून अधिक वाढीसह चांदी ४८.७५ डॉलर प्रति औंसवर पोहोचली.

सोन्या-चांदीतील तेजीची कारणं

सुरक्षित गुंतवणूक आणि औद्योगिक मागणीमुळे सोने आणि चांदीकडे आकर्षण वाढले. चलनवाढीच्या विरोधात बचाव म्हणून सोन्याची मागणी वाढली, खासकरून उदयोन्मुख बाजारपेठांमध्ये मागणी वाढली आहे.. मध्यवर्ती बँकांनी अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सोन्याची खरेदी वाढवली. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हनं व्याजदरांमध्ये कपात केली. सौर पॅनेल आणि इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात चांदीच्या मागणीतही मोठी वाढ झाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Gold price may reach ₹1.45 lakh: Reasons for surge?

Web Summary : Gold and silver prices have broken records, driven by global economic uncertainty and inflation. Experts predict gold could reach ₹1.45 lakh, fueled by central bank buying and increased investment amid a weakening dollar. Silver prices also surged due to industrial demand.
टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक