Join us

Gold Price on 30 April : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2025 14:43 IST

Gold Price 30 April: अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. पाहा काय आहे सोन्याचे नवे दर.

Gold Silver Price 30 April: अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा भाव ३२२ रुपयांनी घसरून ९५,६८९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर, चांदी ११४० रुपयांनी घसरून ९६,०५० रुपये प्रति किलो ग्रॅम झाली. जीएसटीमुळे सोन्याचा भाव आता ९८,५५९ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. तर चांदीचा भाव ९८,७३१ रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने (आयबीजेए) सराफा बाजाराचे दर जाहीर केले आहेत, ज्यात जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. कदाचित तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असू शकतो. आयबीजेए दिवसातून दोनदा दर जारी करते. एकदा दुपारी १२ च्या सुमारास, तर दुसऱ्याला सायंकाळी ५ च्या सुमारास दर जारी केले जातात.

क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

१४ ते २३ कॅरेटचे दर काय?

आयबीजेएच्या दरानुसार आज २३कॅरेट सोन्याचा भाव ३२१ रुपयांनी घसरून ९५,३०६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. तर २२ कॅरेट सोन्याचा सरासरी स्पॉट भाव दुपारी सव्वाबाराच्या सुमारास २९५ रुपयांनी घसरून ८७,६५१ रुपये झाला. १८ कॅरेट सोन्याचा भाव २४१ रुपयांनी कमी झाला असून आता तो ६९,६९० रुपये झाला आहे. तर १४ कॅरेट सोन्याचा भाव १८८ रुपयांनी कमी होऊन ५५,९७८ रुपये झाला आहे.

टॅग्स :सोनंचांदी