Join us

सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 16:49 IST

Gold Silver Price 15 September: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवा दर.

Gold Silver Price 15 September: आज सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या किमतीत थोडीशी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याचा भाव जीएसटीसह प्रति १० ग्रॅम ११२८९१ रुपये आणि चांदी १३१५९५ रुपये प्रति किलो आहे. आज २४ कॅरेट सोनं १०४ रुपयांनी स्वस्त झालं आहे आणि जीएसटीशिवाय प्रति १० ग्रॅम १०९६०३ रुपये झालंय. त्याच वेळी, चांदीच्या दरात २४५ रुपयांची घसरण झाली आहे. आज ते जीएसटीशिवाय १२७७६३ रुपयांवर उघडलं.

या सप्टेंबरमध्ये सोनं प्रति १० ग्रॅम ७२१५ रुपयांनी महाग झाले आहे. तर चांदीच्या किमतीत प्रति किलो १०१९१ रुपयांनी वाढ झाली आहे. आयबीजेएच्या दरांनुसार, ऑगस्टच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी सोनं प्रति १० ग्रॅम १०२३८८ रुपयांवर बंद झाले. चांदी देखील प्रति किलो ११७५७२ रुपयांवर बंद झाली. आयबीजेएनुसार, शुक्रवारी चांदीचा भाव १०९७०७ रुपयांवर बंद झाला. दुसरीकडे, जीएसटीशिवाय चांदीचा भाव १२८००८ रुपये प्रति किलोवर बंद झाला.

Urban Company IPO तुम्हाला लागलाय का, कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?

कॅरेटनुसार सोन्याचा भाव

आज २३ कॅरेट सोन्याचा भावही १०४ रुपयांनी घसरून १०९१६४ रुपये प्रति १० ग्रॅम झाला. जीएसटीसह त्याची किंमत आता ११२४३८ रुपये आहे. यामध्ये अद्याप मेकिंग चार्जेसच समावेश नाही. २२ कॅरेट सोन्याचा भाव ९६ रुपयांनी कमी होऊन १००३९६ रुपये प्रति १० ग्रॅम झाला आहे. जीएसटीसह तो १०३४०७ रुपये झालाय.

आज १८ कॅरेट सोन्याचा भाव ७८ रुपयांनी घसरून ८२२०२ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​उघडला आणि जीएसटीसह तो ८४६६८ रुपये प्रति १० ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. त्याच वेळी, १४ कॅरेट सोन्याचा भाव आता जीएसटीसह ६६०४१ रुपयांवर पोहोचलाय.

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशननं (IBJA) सोने आणि चांदीच्या स्पॉट किमती जाहीर केल्यात. तुमच्या शहरात १००० ते २००० रुपयांचा फरक असण्याची शक्यता आहे. IBJA दिवसातून दोनदा दर जाहीर करते. एकदा दुपारी १२ वाजता आणि दुसऱ्यांदा संध्याकाळी ५ वाजता दर जाहीर केले जातात.

टॅग्स :सोनंचांदीगुंतवणूक