Gold Silver Price On MCX: सोन्या-चांदीच्या किमतीत पुन्हा एकदा मोठी तेजी पाहायला मिळाली. गेल्या सत्रात झालेल्या मोठ्या घसरणीनंतर शुक्रवार, १३ फेब्रुवारी रोजी सोनं आणि चांदीच्या किमतीत जबरदस्त वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) एप्रिल डिलिव्हरी असणारं सोनं सुमारे २,००० रुपये म्हणजेच १.३० टक्क्यांच्या तेजीसह १,५४,८३७ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचलं.
दुसरीकडे, मार्च वायदा चांदीमध्ये यापेक्षाही मोठी उसळी दिसून आली. चांदी ६,६०० रुपयांहून अधिक म्हणजेच २.४ टक्क्यांनी वधारून २,४३,०८१ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. गेल्या सत्रातील मोठ्या विक्रींनंतर गुंतवणूकदारांनी घसरणीला खरेदीची संधी मानल्यानं बाजारपेठेत ही रिकव्हरी पाहायला मिळाली.
जागतिक बाजारपेठेकडून मिळालेला पाठिंबा
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही सोन्या-चांदीच्या किमतीत मजबूती राहिली. अमेरिकेत एप्रिल डिलिव्हरीसाठी गोल्ड फ्युचर्स ०.७ टक्क्यांनी वाढून ४,९८५.४० डॉलर प्रति औंसवर पोहोचले. स्पॉट सिल्व्हर देखील २ टक्क्यांहून अधिक वाढून ७६.७६ डॉलर प्रति औंस झालं. यापूर्वी चांदीत सुमारे ११ टक्क्यांची मोठी घसरण झाली होती, ज्यानंतर 'शॉर्ट कव्हरिंग'मुळे तेजी दिसून आली. तज्ज्ञांच्या मते, गेल्या सत्रात बाजार कोसळत असताना गुंतवणूकदारांनी रोख रक्कम उभारण्यासाठी मौल्यवान धातूंची विक्री केली होती, मात्र आता परिस्थिती स्थिर झाल्यावर पुन्हा खरेदी दिसून येत आहे.
अमेरिकन आर्थिक आकडेवारीचा परिणाम
अमेरिकेतून आलेल्या मजबूत रोजगार आकडेवारीमुळे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीच्या अपेक्षा थोड्या धूसर झाल्या आहेत. जानेवारीत 'नॉनफार्म पेरोल'मध्ये १,३०,००० नवीन नोकऱ्यांची भर पडली, तर बेरोजगारीचा दर घसरून ४.३ टक्क्यांवर आला आहे. या मजबूत आकडेवारीमुळे आता बाजार जुलैमध्ये संभाव्य दर कपातीची अपेक्षा करत आहे. मात्र, गुंतवणूकदारांचं लक्ष आता महागाईच्या आकडेवारीवर असून त्यावरून पुढील दिशा ठरेल.
भविष्यातील वाटचालीचे संकेत
विश्लेषकांच्या मते, जागतिक बाजारपेठेतील किरकोळ सुधारणेमुळे MCX गोल्ड एप्रिल वायदा १,५४,००० रुपयांच्या आसपास टिकून राहू शकतो. त्याचबरोबर चांदीमध्ये शॉर्ट कव्हरिंगमुळे २,४२,००० रुपये प्रति किलोपर्यंत मजबुती येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Web Summary : Gold and silver prices rebounded strongly. MCX gold rose by ₹2,000, while silver jumped over ₹6,600. Global markets supported the rally. Investors await inflation data for future direction, with analysts predicting continued stability for gold and silver.
Web Summary : सोने और चांदी की कीमतों में जोरदार उछाल आया। एमसीएक्स सोना 2,000 रुपये बढ़ा, जबकि चांदी 6,600 रुपये से अधिक चढ़ गई। वैश्विक बाजारों ने तेजी का समर्थन किया। निवेशक भविष्य की दिशा के लिए मुद्रास्फीति के आंकड़ों का इंतजार कर रहे हैं, विश्लेषकों ने सोने और चांदी के लिए निरंतर स्थिरता की भविष्यवाणी की है।